#BREAKING: मुंबईपाठोपाठ पुण्यात कोरोनाचा कहर; एका दिवसात आकडा 41 ने वाढला

#BREAKING: मुंबईपाठोपाठ पुण्यात कोरोनाचा कहर; एका दिवसात आकडा 41 ने वाढला

पुणे महापालिकेचं कोरोनाग्रस्तांच्या उपचाराचं मुख्य केंद्र बनलेलं नायडू हाॅस्पिटल पूर्ण भरलं आहे. तिथे एकही बेड रिकामा नाही.

  • Share this:

पुणे, 6 एप्रिल : मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढतो आहे. आता मुंबईतपाठोपाठ पुण्यातही या साथीची दहशत पसरायला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला आटोक्यात येईल असं वाटत असताना आता पुण्यातही Coronavirus वेगाने पसरतो आहे. गेल्या 24 तासांत शहरात 41 रुग्ण वाढले. पुणे आणि पिंपरी चिंचवडचा एकत्रित आकडा तर मोठा आहेच. पण फक्त पुणे महापालिकेच्या हद्दीतच रुग्णसंख्येने शंभरी पार केली. मुंबईत दिवसभरात 68 रुग्ण वाढले. राज्यात आज दिवसभरात 120 कोरोनारुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यात सध्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 868 झाला आहे.

दरम्यान आज दिवसभरात राज्यात 7 जणांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला. हे सगळे रुग्ण मुंबई आणि परिसरात दाखल होते. यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनाबळींची संख्या 52 झाली आहे.

मुंबई - 04,

वसई-विरार - 01

ठाणे - 01

नवी मुंबई - 01

पूर्व पुणे पूर्ण सील

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात Coronavirus चा कहर दिवसेंदिवस वाढतो आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार आता पुण्याचा पूर्व भाग पूर्णपणे सील करण्यात येणार आहे.

चिंता वाढली.. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अपेक्षेपेक्षा जास्त, सरकारने घेतला मोठा

पुण्याचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिलेल्या आदेशानुसार, पूर्व पुण्याचे भवानी पेठ, नाना पेठ, कासेवाडी, गुलटेकडी, पुणे स्टेशन परिसर हे भाग पूर्णपणे सील करण्यात येणार आहेत. या परिसरात कोरोनाव्हायरसचा प्रदुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे कम्युनिटी स्प्रेडचा धोका लक्षात घेऊन या परिसरातली वर्दळ पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

नायडू रुग्णालय फुल्ल

पुणे महापालिकेचं कोरोनाग्रस्तांच्या उपचाराचं मुख्य केंद्र बनलेलं नायडू हाॅस्पिटल पूर्ण भरलं आहे. तिथे एकही बेड रिकामा नाही. आता कोरोनाची लक्षणं असणाऱ्या रुग्णांवर बोपोडीमध्ये उपचार होतील. त्यानंतर सिम्बायोसिसच्या लवळे परिसरातल्या हाॅस्पिटलमध्ये उपचार केले जातील, असं महापालिकेकडून सांगण्यात आलं.

पुण्यात महिलेची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर तिसऱ्या दिवशीच झाला मृत्यू

कुठल्या भागात सापडला कोरोना?

पुण्यातील सर्वच भागात कोरोनाव्हायरचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांना अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यातील सर्वाधिक रुग्ण हे सहकारनगर, मंगळवार पेठ, नाना पेठ, सिंहगड रोड, कोंढवा या भागात आढळले आहेत.

सिंहगड रोडवर वडगाव खुर्द, वडगाव बुद्रुक या भागातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रास्ता पेठ, गंज पेठ, रविवार पेठ, कसबा पेठ, गुरुवार पेठ, घोरपडे पेठ, शुक्रवार पेठ, पर्वती गाव, सय्यदनगर, हडपसर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, मुंढवा, कोरेगाव पार्क, कोथरूड, मांजरी, नांदेड सिटी, मांगडेवाडी, कात्रज, कर्वेरोड, गुलटेकडी, लक्ष्मीनगर -येरवडा, कल्याणी नगर, बाणेर या ठिकाणीही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे.

सहाव्या नेगिटिव्ह टेस्टनंतर कनिका कपूरला डिस्चार्ज, डॉक्टरांनी केली 'ही' सूचना

First published: April 6, 2020, 8:04 PM IST

ताज्या बातम्या