ऐन लॉकडाऊनमध्ये 90 वर्षीय आई-बापाला मुलांनी सोडलं वाऱ्यावर, पोलीस अधिकारी श्रावण बाळ होऊन करतोय सेवा

ऐन लॉकडाऊनमध्ये 90 वर्षीय आई-बापाला मुलांनी सोडलं वाऱ्यावर, पोलीस अधिकारी श्रावण बाळ होऊन करतोय सेवा

या दाम्पत्याला दोन मुलगे आणि एक मुलगी आहे. देशभरात कोरोनाची भीती असताना ते आपल्या आई-बाबांना सोडून निघून गेले

  • Share this:

पाटना, 6 एप्रिल : एकीकडे कोरोनामुळे (Coronavirus) देशभरात भीतीचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी टाळ्या वाजवून आणि कधी एकतेचा दिवा पेटवण्याचं आवाहन करुन संकटाच्या वेळी एकता आणि आत्मविश्वासाचा संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा वेळी असे काही लोक आहेत जे या कठीण काळातही गरजुंना मदत करून एक हिरो म्हणून उदयास येत आहेत. असाच एक खरा हिरो आहे जो, आज एका वृद्ध जोडप्यासाठी ‘तारणहार’ बनला आहे.

पाटना पोलिसांचे कांकरबाग पोलीस स्टेशनचा प्रमुख मनोरंजन भारती यांनी एक नवीन आदर्श समोर ठेवला आहे. आदर्शवत वाटावा असा प्रसंग खऱ्या आयुष्यात पाहायला मिळत आहे. बिहार पोलिसांसाठी मनोरंजन भारतीसारखे लोक एक आदर्श उदाहरण बनले आहेत.

संबंधित - कोरोनाला रोखण्यासाठी 'या' राज्यात लॉकडाऊन वाढणार, CM चं पंतप्रधानांना आवाहन

एका वयस्क जोडप्यासाठी पोलीस बनला तारणहार

लोकांमध्ये पोलिसांबद्दल भिन्न मतं आहेत. अशा परिस्थितीत बिहार पोलिसांच्या एका पोलिस अधिकाऱ्याने असे काही केले आहे की ज्यामुळे पोलिसांना त्यांच्या कडक प्रतिमेवरुन एक दयाळू चेहरा मिळवून दिला आहे. खरंतर ही पाटण्यातील कांकरबाग भागात राहणाऱ्या एका वयस्क जोडप्याची कहाणी आहे.

लॉकडाउन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या संकटाच्या वेळी आई-वडिलांनी त्यांच्या मुलांनी एकटं सोडलं आहे. त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी आहे, पण या संकटात दोन्ही मुलांनी पाठ फिरविली आहे. अशा परिस्थितीत कांकरबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोरंजन भारती या वृद्ध जोडप्याचे पालन-पोषण करीत आहेत आणि त्यांना त्यांच्या घरी जेवण व औषधे पाठवतात.

जेव्हा न्यूज 18 ने या वृद्ध दाम्पत्याची वेदना जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा 90 वर्षांचे कानन बिहार भौमिक खूप भावूक झाले आणि म्हणाले की, हा पोलीस माझा मुलगा नाही, मात्र हा आम्हा वृद्धांसाठी देव बनून आला आहे. असं म्हणत असताना ते ढसाढसा रडू लागले. यावेळी त्यांच्या शेजारी बसलेली त्यांची पत्नीही रडू लागली आणि म्हणाली, मी तुला जन्म तर दिला नाही. पण आमच्यासाठी तू श्रावणबाळासारखा धावून आलास. हे ऐकल्यानंतर मनोरंजन भारतींना देखील अश्रू रोखू शकले नाही.

First published: April 6, 2020, 10:10 PM IST

ताज्या बातम्या