कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर KDMCने जारी केले कठोर आदेश

कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर KDMCने जारी केले कठोर आदेश

कल्याण डोंबिवलीत करोनाचा प्रादुर्भाव उच्च पातळींवर असताना बेजबाबदारपणाचा अक्षरश: कळस केला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कठोर निर्णय घेतला आहे.

  • Share this:

कल्याण, 6 एप्रिल: राज्यात कोरोनारुग्णांची संख्या दररोज शेकडोंनी वाढत आहे. मृत्यूंची संख्याही वाढत आहे. तरीही परिस्थितीचं गांभीर्य काही जणांच्या लक्षात येत नाही आहे. लॉकडाऊनमध्येही काही लोक विनाकारण रस्त्यावर दिसत आहे. कल्याण डोंबिवलीत करोनाचा प्रादुर्भाव उच्च पातळींवर असताना बेजबाबदारपणाचा अक्षरश: कळस केला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कठोर निर्णय घेतला आहे.

हेही वाचा..मुंबईपाठोपाठ पुण्यात कोरोनाचा कहर; एका दिवसात आकडा 41 ने वाढला

कल्याण-डोंबिवलीचे सर्व प्रवेशद्वार बंद करण्याचे आदेश महानगरपालिकेचे आयु्क्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. कोणताही नागरीक परवानगी शिवाय महानगरपालिकेच्या हद्दीतून आत-बाहेर येऊ जावू शकत नाही. या संदर्भात अधिनियम व महाराष्ट्र Covid-19 उपाययोजना नियम 2020 चा नियम 03 नुसार महानगरपालिकेच्या हद्दीत Covid-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून कल्याण-डोंबिवली शहरातील सर्व प्रवेशद्वारावर पोलिस बंदोबस्त ठेवून प्रवेश बंद करण्यात यावा, अत्यावश्यक असेल तरच बाहेरील नागरीकांची आरोग्य तपासणी करुनच शहरात प्रवेश द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा..चिंता वाढली.. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अपेक्षेपेक्षा जास्त, सरकारने घेतला मोठा

या बंदीतून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. त्यात किराण सामान, औषधी, दूध आणि भाजीपालाचा समावेश आहे. महानगरपालिकेच्या सर्व प्रवेश्द्वारावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवून नाकाबंदी करण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी, असेही आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

कल्याण डोंबिवलीत कोरोनाबाधितांची संख्या 34 वर

दरम्यान, महनगरपालिकेच्या हद्दीत कोरोनाबाधित रूग्‍णांची संख्‍या 34 वर पोहोचली आहे. त्‍यापैकी डोंबिवली येथील लग्‍न सोहळ्याशी संबंधित एका रुग्‍णाला कस्‍तुरबा रुग्‍णालयातून पुर्नतपासणी अंती डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे डिस्चार्ज मिळालेल्‍या रुग्‍णांची संख्‍या आता 6 झाली आहे. यात 4 कल्‍याण आणि 2 डोंबिवलीमधील रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा..मोदींच्या आवाहनानंतर फटाके वाजवणाऱ्यांना सोनमने म्हटलं मूर्ख, लोकांनी केलं ट्रोल

महापौरांना व्हावं लागलं होम क्वारंटाइन

धक्कादायक म्हणजे डोंबिवलीत झालेल्या त्या लग्न सोहळ्याला महापौर विनिता राणे यांच्यासह इतर पदाधिकारीही हजर होते. त्यामुळे विनिता राणे यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन केले आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी डोंबिवलीतील मढवी बंगला इथला परिसर पूर्णपणे सील केला आहे.

First published: April 6, 2020, 8:41 PM IST

ताज्या बातम्या