बोरिवली, 29 मे : देशभरात लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग आणि कामधंदे बंद झाले. काही कामधंदे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे हातावर पोट असणारे अनेक मजूर बेरोजगार झाले आहेत. या परप्रांतीय मजूर मूळ गावी जाण्यासाठी धडपड करत आहेत. कुणी ट्रकनं तर कुणी पायी चालत निघालं आहे. प्रशासनाकडून मजुरांसाठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र या श्रमिक ट्रेनची अवस्था अत्यंत बिकट असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे. सर्व ट्रेनमध्ये सॅनिटाझेशन केल्याचं सांगितलं जात असतानाच बोरिवलीहून कच्छला जाणाऱ्या एका एक्स्प्रेसचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ट्रेनच्या बोगित पाणी नाही आणि टॉयलेटमध्ये अस्वच्छता, संपूर्ण ट्रेनमध्ये धूळ आणि भरलेला डबा अशी बोगिची अवस्था होती. मजुरांच्या सुरक्षेची काळजी देखील घेण्यात आली नाही असा आरोप प्रवाशांनी केला आहे.
पश्चिम रेल्वेच्या या श्रमिक ट्रेनची अवस्था एका प्रवाशानेच चव्हाट्यावर आणली. या प्रवाशानं मजुरांसह इतर नागरिकांना या ट्रेनमधून प्रवास करण टाळा असं आवाहनही केलं आहे. मुजरांमाच्या समस्या आणि हाल काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. अनेक संकटांचा सामना करत आपल्या गावापर्यंत पोहोचण्याची त्यांची धडपड सुरूच आहे. प्रशासनाकडून त्यांची सोय करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या एक्स्प्रेसची अवस्था पाहून मजुरांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. हे वाचा- बेफिकीर मुंबईकरांनो काय करताय? लॉकडाऊनमधल्या जिवघेण्या वाहतूक कोंडीचे PHOTO हे वाचा- 9 महिन्याच्या गरोदर महिलेला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने काढलं घराबाहेर संपादन- क्रांती कानेटकर