धक्कादायक प्रकार! 9 महिन्याच्या गरोदर महिलेला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने काढलं घराबाहेर

धक्कादायक प्रकार! 9 महिन्याच्या गरोदर महिलेला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने काढलं घराबाहेर

  • Share this:

सुमित सोनावणे, प्रतिनिधी

दौंड, 29 मे : दौंडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याने स्वतः च्या घरात भाड्याने राहत असलेल्या नऊ महिन्याच्या गरोदर महिलेला घरातून बाहेर हाकलून दिलं असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता त्या गरोदर महिलेला अशा अवस्थेत शिशु विकास मंदिर या शाळेत राहण्याची वेळ आली आहे. तिने या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

महिला रेणुका अजय महाजन यांच्या सासरी कोणी करायला नसल्यानं ही नऊ महिन्याची गरोदर महिला मुंबईहुन तिच्या माहेरी दौंडमध्ये डिलिव्हरीसाठी आली होती. तिचे आई-वडील भाऊ हे दौंडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थानिक पदाधिकारी असलेला भाड्याच्या घरामध्ये गेल्या 8 वर्षांपासून राहत होते.

भारतात कोरोनाने मोडले आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड, 24 तासांत नव्या रुग्णांचा कहर

मुंबईवरून सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊन माहेरी डिलिव्हरीसाठी आली म्हणून त्या गरोदर महिलेला आई-वडील आणि चार वर्षाच्या मुलीसह घराच्या बाहेर काढलं. त्या महिलेचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असतानादेखील तिचे आईवडील राहत असलेल्या भाड्याच्या घरातून बाहेर पडण्याची तिच्यावर वेळ आली. या गरोदर महिलेचे नऊ महिने पूर्ण झाले आहेत. रेणुका यांची कधीही डिलिव्हरी होऊ शकते तरी देखील या पदाधिकाऱ्याने माणुसकी दाखवली नाही.

पुण्यातील अक्षय बोऱ्हाडे प्रकरणाला नवं वळण, FB व्हिडिओनंतर उमटले राजकीय पडसाद

राज्य सरकारने कोरोनाच्या काळात घर मालकांना सूचना देऊनदेखील गरोदरपणात घर मालकाच्या जाचाला कंटाळून घर सोडून देण्याची वेळ तिच्यावर आली. सध्या रेणुका या आपल्या आई-वडील आणि चार वर्षाच्या मुलीसह शाळेत राहत आहे. अशा अवस्थेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हा अध्यक्षा वैशाली नागवडे या समोर येत या महिलेची जबाबदारी त्यांनी घेतली.

तिची पुढची वैद्यकीय उपचाराची जबाबदारी स्वीकारली असून एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याने गरोदर महिलेला घरातून बाहेर काढले तर दुसरीकडे त्याच महिलेची डिलिव्हरी करण्यासाठी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा पुढे आल्या आहेत. हे दोन्ही स्थानिक नेते एकाच पक्षाचे पण विचारांमध्ये मतभिन्नता दिसुन येते. या सगळ्या प्रकारानंतर गरोदर महिलेला घरा बाहेर काढणाऱ्या पदाधिकाऱ्यावर सुप्रिया सुळे कारवाई करणार का असा प्रश्न निर्माण होत आहे?

गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीनिमित्त पंकजा मुंडेंची भावनिक साद

संपादन -रेणुका धायबर

First published: May 29, 2020, 11:03 AM IST

ताज्या बातम्या