कोरोनाचा धोका वाढला, मुंबईत दिवसभरात 10 दगावले, रुग्णांनी एक हजाराचा टप्पा ओलांडला

मुंबईत एकाच दिवसात 218 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत एकाच दिवसात 218 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:
    मुंबई,10 एप्रिल: संपूर्ण देशासह महाराष्ट्रातही कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. मुंबईत आज (10 एप्रिल) कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचा रेकॉर्ड ब्रेक आकडा समोर आला आहे. मुंबईत एकाच दिवसात 218 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या आता हजाराच्या घरात पोहोचली आहे. मुंबईत रुग्णांची संख्या 1008 झाली असून मृतांचा आकडा 64 वर पोहोचला आहे. हेही वाचा.. 24 तासात 37 मृत्यू, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 6761 वर देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यातल मुंबईत कोरोनाबाधितांची दिवसागणिक वाढते आहे. आतापर्यंत सर्वात जास्त रुग्ण 10 एप्रिल रोजी सापडले आहेत. बरे झालेल्या चार जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात 16 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 364 वरुन 1 हजार 380 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात 16 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ही 1 हजार 574 वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यात मुंबई शहर, उपनगर, पुणे शहर आणि ग्रामीण, तसेच पिंपरी चिंचवड परिसरात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईच्या दाट लोकवस्तीत निर्जंतुकीरणासाठी ड्रोनचा वापर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या दाट लोकवस्तीच्या भागात लॉकडाऊन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि निर्जंतुकीरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी महापालिकेला सूचना देण्यात आल्या आहेत. याभागात राज्य राखीव पोलिस दलाची मदत घेण्यातही गृहमंत्र्यांकडे मागणी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. हेही वाचा..जनधनचे 500 रुपये आणायला गेल्या 39 महिला आणि 10 हजार दंड भरून परतल्या! यासंदर्भात अधिक माहिती देतांना आरोग्यंमत्री म्हणाले, मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत कोरोना संसर्ग रोखण्याच्या मुद्यावर विशेष उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली. मुंबईत कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर होत असलेली वाढ काळजी वाढवणारी असून याबाबत मुंबईचे लोकप्रतिनिधी जे मंत्रिमंडळातील सदस्य आहेत त्यांनी त्यांचे निरीक्षणे मांडली. गर्दी आणि दाटीवाटीच्या ठिकाणी संसर्ग रोखण्यासाठी महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडले. दाटीवाटीच्या ठिकाणी लॉकडाऊनचे पालन सक्तीने झाले पाहिजे. ते अधिक प्रभावीपणे होण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाची मदत घेण्याबाबत गृहमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली. गर्दीच्या ठिकाणी राज्य राखीव पोलिस दल तैनात करण्यात यावे. गर्दीचे संनियंत्रण महत्वाचे असून आता त्यासाठी नियंत्रण कक्षाच्या मदतीने सीसीटिव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येते. मात्र रस्त्यांवरील गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची मदत घेण्याबाबत निर्णय झाला. सीसीसीटिव्ही, एसआरपीएफ,ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून लॉकडाऊनचे पालन अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. हेही वाचा...खुशखबर! 10 पास असणाऱ्यांना BMC मध्ये नोकरीची संधी, 60 हजारांपर्यंत मिळेल सॅलरी संपादन- संदीप पारोळेकर
    First published: