भोपाळ, 10 एप्रिल : देशभरात लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर घराबाहेर पडल्यास पोलीस कारवाई केली जात आहे. याचाच फटका मध्यप्रदेशातील 39 महिलांना बसला आहे. भिंड शहरात लॉकडाऊनवेळी महिलांना पंतप्रधान जनधन योजनेतून मिळालेले 500 रुपये आणायला जाणं महागात पडलं. महिलांना 500 रुपये तर मिळाले नाहीतच पण त्यांना 10 हजार रुपयांचा दंड भरल्यानंतर सुटका झाली. सोशल डिस्टन्सिंग चं उल्लंघन केल्या प्रकरणी 39 महिलांना तुरुंगात धाडलं होतं. त्यांच्यावर 151 अंतर्गत कारवाईसुद्दा केली होती. 5 तास तुरुंगात ठेवल्यानंतर महिलांची सुटका कऱण्यात आली.
याबाबत 39 महिलांपैकी एक असलेल्या गीता शाक्य यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं की, आम्ही पैसे काढायला गेल्यावर पकडण्यात आलं. त्यानंतर 10 हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली. आता आम्ही पैसे आणायला जाणार नाही.' गिता यांच्यासोबत इतर महिलासुद्धा होत्या. गिता यांच्या प्रमाणेच हातावरचं पोट असलेल्या त्या सर्वांना कोरोनामुळे बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. त्या सर्व महिला जनधन खात्यावर पैसे मिळणार हे समजल्यानंतर जवळच्याच बँकेत गेल्या होत्या. मात्र त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत सरकारी शाळेत तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या जेलमध्ये ठेवण्यात आलं. शेवटी सायंकाळी 10 हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची सुटका झाली.
हे वाचा : बुलडाण्यात कोरोनाचा कहर, आयसोलेशन वार्डात उपचार घेणाऱ्या महिलेचा मृत्यू
पोलिसांनी सांगितलं की, 'एके ठिकाणी गर्दी झाली असून लॉकडाऊनचं उल्लंघन होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी जवळपास 39 महिलांना ताब्यात घेतलं. त्यांच्यावर 151 अंतर्गत कारवाई करण्यात आली.' दुसरीकडे जिल्हाधिकारी छोटे सिंग यांनी सांगितलं की, महिलांना समजावून सांगितल्यानंतरही त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळं पोलिसांना कारवाई करावी लागली. सोशल डिस्टन्सिंग असताना त्यांना वाहनांमध्ये भरून नेलं कारण त्यावेळी महिलांना कंट्रोल करण्यासाठी पर्याय नव्हता.'
हे वाचा : धक्कादायक! भारतात कोरोना पसरवण्याचा कट, देशात पाठवलेत 40-50 संशयित रुग्ण?
कोरोना व्हायरसमुळे लॉकाडऊनची घोषणा देशात करण्यात आली आहे. यामध्ये गरीबांना पैशांची अडचण येऊ नये यासाठी जनधन खात्यात सरकारने 500 रुपये टाकले आहेत. याची माहिती मिळताच भिंडमध्ये महिला मोठ्या संख्येनं बँकेत पोहोचल्या. यामुळे गर्दी झाली आणि सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला गेला नाही
हे वाचा : '
कोरोना'पासून कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी रेल्वेनं असं केलं प्लॅनिंग!
संपादन - सुरज यादव
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.