नवी दिल्ली, 10 एप्रिल : देशभरातील कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 24 तासांत देशात 37 मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली आहे.
कोरोनावरील (Covid - 19) नियंत्रणासाठी देशभरात लॉकडाऊन (LOckdown) लागू करण्यात आलं आहे. अद्याप देशातील कोरोनाबाधिकांचा आकडा वाढत असताना दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत ओडिशा आणि पंजाब या दोन राज्यांनी लॉकडाऊनची मर्यादा वाढवून 30 एप्रिलपर्यंत केली आहे.
37 deaths, 896 new cases in last 24 hours, the sharpest ever increase in cases; India's total number of #Coronavirus positive cases rises to 6761 (including 6039 active cases, 516 cured/discharged/migrated and 206 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/HbQKf5BMPt
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 24 तासांत देशात 37 जणांचा मृत्यू झाला असून 896 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार आता देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 6761 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 206 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 516 इतका आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.