• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • काँग्रेसमध्ये वादाची किनार, माजी मुख्यमंत्री राज्यातील नेत्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज

काँग्रेसमध्ये वादाची किनार, माजी मुख्यमंत्री राज्यातील नेत्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज

काँग्रेसने आधीच कृषी कायद्याला विरोध दर्शवला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या तिन्ही कायद्याविरोधात...

  • Share this:
मुंबई, 11 मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे (Maharashtra budget session 2021) सूप वाजले आहे. पण आता काँग्रेसमध्ये (Prithviraj Chavan) अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची चिन्ह आहे. काँग्रेसचे (Congress) नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या कार्यपद्धतीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. न्यूज18 लोकमतशी बोलत असताना  पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस विधिमंडळ गट नेते बाळासाहेब थोरात, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे नाव न घेता नाराजी व्यक्त केली आहे. MPSC Exam: पुण्यात विद्यार्थ्यांचा उद्रेक, परीक्षा लांबणीवर गेल्याने रास्तारोको 'अर्थसंकल्प अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार हे केंद्र सरकारच्या कृषी कायदा विरोधात आहे. काँग्रेसने आधीच या कायद्याला विरोध दर्शवला आहे. राज्यात कायदा विधिमंडळात मंजूर केला जाणार होता. पण, या अधिवेशनामध्ये कृषी कायद्याबद्दल काहीच निर्णय झाला नाही', यावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. विधानसभा अध्यक्षपद निवडणूक का झाली माहिती नाही पण कृषी कायदा दुरूस्तीची भूमिका आमची होती. पण काहीच झाले नाही. वास्तविक याबाबत निर्णय होणे गरजेचे होते, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तसंच, 'पृथ्वीराज चव्हाण यांनी एमपीएससी परीक्षा यावर पहिले तीन प्रश्न आहेत. ते प्रथम  घ्यावे बाकी मग इतर विषयावर नंतर घेता येईल' असं मत व्यक्त केलं. काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी घेतली शरद पवारांची भेट हार्दिक पटेल यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यानंतर त्यांना तात्काळ गुजरात काँग्रेस कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देखील देण्यात आली अर्थात गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पटेल काँग्रेस पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विस्ताराच्या दृष्टिकोनातून गुजरातमध्ये हार्दिक पटेल यांची चाचपणी करत आहे की काय अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. त्याच अनुषंगाने ही भेट होती, असंही म्हटलं जातं आहे. इथे होते Royal Enfield Bullet ची पूजा, वाचा अनोख्या मंदिराची कहाणी सकाळी झालेल्या 20 मिनिटांच्या भेटीदरम्यान गुजरात राज्यातील राजकीय परिस्थिती तसंच जातीय आरक्षण याच्यावर देखील चर्चा झाल्याचे समजते. हार्दिक पटेल आणि शरद पवार यांच्या भेटीमागे मुंबईत काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेले खासदार मोहन डेलकर हा देखील चर्चेचा विषय होता असं म्हटलं जातं आहे.
Published by:sachin Salve
First published: