मुंबई, 07 जून: राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी भेटीचे सत्र सुरू आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी शरद पवार यांची भेट घेतली. गेल्या आठवड्याभरापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये तणावाचे वातावरण आहे, त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, चर्चेचा तपशील अद्याप समोर येऊ शकला नाही. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलं आहे. शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास झाल्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. विश्रांती घेतल्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा कामाला लागले आहे. पवारांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी सत्ताधारी मित्रपक्षातील नेते आणि भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस सुद्धा पोहोचले होते.
‘तो नसता तर मी नसते’; या मराठी अभिनेत्यामुळं एकता कपूर झाली TV Queen
विशेष म्हणजे, पदोन्नती आरक्षणाच्या मुद्यावरून काँग्रेसचे नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आक्रमकपणे बाजू लावून धरली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला विश्वासात न घेता पदोन्नती आरक्षणाचा निर्णय घेतला, असा आरोपच राऊत यांनी केला होता. त्यानंतर अनेक बैठका घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला.
WTC 2021 Final : 'फॉलो ऑन'च्या नियमाबाबत ICC ची मोठी घोषणा
तर दुसरीकडे, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकच्या घोषणा करून एकच बॉम्ब टाकला होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेहमी घोषणा करत असताना वडेट्टीवार यांनी घोषणा केल्यामुळे महाविकास आघाडीचे अनेक मंत्र्यांना नाराजी व्यक्त केली होती.
ज्येष्ठ नेते, @NCPspeaks चे अध्यक्ष @PawarSpeaks जी यांची भेट घेतली. pic.twitter.com/YrIbJggORZ
— Balasaheb Thorat (@bb_thorat) June 7, 2021
त्यामुळे शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीतून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतला वाद निवळण्याची चिन्ह आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Balasaheb thorat, Congress, NCP, Sharad pawar