दुबई, 7 जून: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs new Zealand) यांच्यात 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final 2021) होणार आहे. या ऐतिहासिक फायनलकडं संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं आहे. या टेस्टसाठी आयसीसीने (ICC) अनेक नियम बनवले आहेत. यामध्ये ही टेस्ट टाय किंवा ड्रॉ झाली तर दोन्ही टीमनं संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात येईल. फायनलसाठी एक दिवस रिझर्व ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर फायनल मॅच ड्यूक बॉलने खेळवली जाणार आहे.
आयसीसीने फायनल मॅचमधील फॉलो ऑनबाबत (Follow On) मोठी घोषणा केली आहे. 'या टेस्ट मॅचचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला तर अन्य टेस्ट मॅचसाठी असलेला नियमच फायनलमध्येही लागू होईल. यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही.' अशी घोषणा आयसीसीनं केली आहे. 'क्रिकबझ' च्या वृत्तानुसार फायनल मॅचसाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आल्यानं आयसीसीनं हे स्पष्टीकरण दिलं आहे.
काय आहे नियम?
आयसीसीच्या प्लेईंग कंडिशन 14.1.1 च्या सामान्य फॉलो ऑनच्या नियमानुसार पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या टीमला 200 रनची आघाडी मिळाल्यानंतर ते प्रतिस्पर्धी टीमला पुन्हा बॅटींगसाठी बोलावू शकतात. 14.1.2 नियमानुसार 3 किंवा 4 दिवसांचा खेळ झाला तर 150 रन, 2 दिवसांच्या मॅचमध्ये 100 रन आणि एका दिवसाच्या मॅचमध्ये 75 रनची आघाडी फॉलो ऑन देण्यासाठी आवश्यक आहे.
इंग्लंडमध्ये टीम इंडियाचा लाजीरवाणा रेकॉर्ड, 0 रनमध्ये गमावल्या 4 विकेट्स
पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी खेळ झाला नाही तर 14.1 च्या नियमानुसार खेळातील बाकी दिवसांच्या (निर्धारित रिझर्व डे सह) संख्येनुसार नियम निश्चित होईल. ज्या दिवशी टेस्ट पहिल्यांदा सुरु होईल, त्याला दिवसाला पूर्ण दिवस समजले जाईल. त्या दिवशी कोणत्याही वेळी टेस्ट सुरु झाली तरी पहिली ओव्हर सुरु होताच तो संपूर्ण दिवस ग्राह्य धरण्यात येईल, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Icc, New zealand, Team india