ठाणे, 5 जून: राज्य सरकारने कोरोना विषयक उपाययोजना संदर्भात केलेला लॉकडाऊन 5 टप्प्याटप्प्यानं उठवण्याबात मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार ठाणे महानगर पालिकेने प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहरातील सर्व दुकाने सशर्त उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, प्रशासनाची आदेशामुळे दुकानदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. हेही वाचा… …तर त्या शासकीय कर्मचाऱ्याचा पगार कपात करावा, उद्धव ठाकरे सरकारचा नवा आदेश कोपरी-नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीतील दुकाने उघडण्यासंदर्भात काढण्यात आलेला आदेश हा गोंधळ निर्माण करणारा आहे. या आदेशाबाबत पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. कोर्ट नाका ते पुढे बाजारपेठेतील दुकाने समाविषम तारखेनुसार उघडण्यास परवानगी देण्याबरोबर या अंतर्गत येणाऱ्या छोट्या मोठ्या गल्ल्यांचाही यामध्ये समावेश करणे अपेक्षित असताना तसे या आदेशामध्ये करण्यात आलेले नाही. त्यामुशे शुक्रवारी आज दोन्ही बाजूची काही दुकाने उघडी करण्यात आली. पोलिसांनी महापालिका प्रशासनाला सुधारित आदेश काढण्याच्या सूचना केल्या आहेत. गेले दीड ते दोन महिने ठाण्यातील दुकाने पूर्णपणे बंद असल्याने अर्थकारण पूर्ण थांबले होते. अखेर शुक्रवारपासून दुकाने उघडण्यास सशर्त परवानगी देण्यात आली. तरी कोपरी आणि नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने या परिसरातील दुकाने सम-विषम तारखेला उघडी करण्याची परवानगी देण्यात आली होती. हेही वाचा… महाराष्ट्रात या जिल्ह्यात पुन्हा वाढला कोरोनाचा धोका, प्रशासनानं दिली सक्त ताकीद मात्र, कोर्ट नाका ते पुढे बाजारपेठेपर्यंत दोन्ही बाजूनी दुकाने काही प्रमाणात उघडी करण्यात आली असून ठाणे महापालिकेची ही ऑर्डर गोंधळात टाकणारी आहे, असे नौपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामराव सोमवंशी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही सुधारीत ऑर्डर काढावी, अशी आपण ठाणे महापालिकेला सूचना करणार असून तसे नाही झाले तर सोशल डिस्टंसिंग करणे फार कठीण जाणार आल्याचे सोमवंशी यांनी स्पष्ट केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.