महाराष्ट्रात या जिल्ह्यात पुन्हा वाढला कोरोनाचा धोका, प्रशासनानं दिली सक्त ताकीद

महाराष्ट्रात या जिल्ह्यात पुन्हा वाढला कोरोनाचा धोका, प्रशासनानं दिली सक्त ताकीद

लॉकडाऊनचे नियम कठोर केल्यानंतरही कोरोनाबाधित रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे.

  • Share this:

जालना, 5 जून: जालना शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. लॉकडाऊनचे नियम कठोर केल्यानंतरही कोरोनाबाधित रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हाप्रशासन खळबडून जागं झालं आहे. कंन्टेन्टमेंट झोनमध्ये लॉकडाऊन आणि सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे काटेकारपणे पालन व्हावे, यासाठी आता जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे.

हेही वाचा.....तर त्या शासकीय कर्मचाऱ्याचा पगार कपात करावा, उद्धव ठाकरे सरकारचा नवा आदेश

कंन्टेन्टमेंट झोनमधुन एकही व्यक्ती विनाकारण बाहेर पडणार नाही, याची दक्षता घ्या, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणूच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी एका विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. याबैठकीत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्यासह जिल्हा परिषद, नगर पालिका, महसूल, पोलिस आणि आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात देखील कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून अशा कंटेंटमेंट झोनमध्ये नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सक्त ताकीद दिली. तसेच होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींनी घरातच राहणे अनिवार्य आहे. होम क्वारंटाईन केले असताना सुद्धा बाहेर कोणी फिरताना आढळल्यास अशा व्यक्तींवर कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी यावेळी दिले.

औरंगाबादेत 34 वर्षीय महिलेचा मृत्यू

औरंगाबाद कोरोनामुळे रहेमानिया कॉलनी भागात राहणाऱ्या 34 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादमध्ये आतापर्यंत 94 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, काल, गुरुवारी 92 रुग्णांची भर पडली. जालना येथे एका 58 वर्षीय वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर 5 रुग्ण आढळले. नांदेड येथे 7, उस्मानाबाद जिल्ह्यात 10, हिंगोली 3, तर परभणीत दोघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

हेही वाचा...धक्कादायक! शिकाऊ नर्सची काढली छेड, बीड रुग्णालयातील व्हिडिओ आला समोर

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील चोंढी खुर्द येथे 17 वर्षीय विद्यार्थी, वसमत तालुक्यातील हयातनगर येथील 12 वर्षाची मुलगी व 23 वर्षाच्या तरुणालाही कोरोनाची बाधा झाली आहे. नांदेडमध्ये 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. परभणीच्या पाथरी तालुक्यातील रामपुरी येथे एक तर परभणी शहरातील मिलिंदनगर भागात एक असे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात 10 नवे रुग्ण आढळले. 7 रुग्ण काकानगरचे आहेत. ते पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.

First published: June 5, 2020, 6:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading