मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबई संपूर्ण लॉकडाऊनच्या दिशेने! कोरोना स्थिती पाहाता महापौरांनी दिले संकेत

मुंबई संपूर्ण लॉकडाऊनच्या दिशेने! कोरोना स्थिती पाहाता महापौरांनी दिले संकेत

मुंबईमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown in Mumbai) लावलं जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वतः महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांनी मुंबईतील परिस्थिती पाहाता, हा एकच पर्याय उरला असल्याचं म्हटलं आहे.

मुंबई 17 एप्रिल : राज्यात नाईट कर्फ्यू, वीकेण्ड लॉकडाऊन आणि मिनी लॉकडाऊन असतानाही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ नोंदवली जात आहे. कोरोनाच्या प्रसाराचा वेग कमी होण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. राज्यात मुंबईतील परिस्थिती सर्वाधिक भयंकर आहे. इथे शुक्रवारी एका दिवसात तब्बल 9 हजार जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अशात आता वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता मुंबईमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown in Mumbai) लावलं जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वतः महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांनी मुंबईतील परिस्थिती पाहाता, हा एकच पर्याय उरला असल्याचं म्हटलं आहे.

एएनआय या वृत्त संस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, किशोरी पेडणेकर म्हणाल्या, की मुंबईमध्ये तब्बल 95 टक्के लोक नियमांचं पालन (COVID19 Restrictions) करत आहेत. मात्र, केवळ 5 टक्के लोक असे आहेत, जे नियमांचं पालन करत नाहीत. त्यांच्यामुळे इतरांनाही त्रास सहन करावा लागत आहे. मला असं वाटतं, की कोरोनाची सध्याची स्थिती पाहाता मुंबईमध्ये संपूर्ण लॉकडाऊन (Complete Lockdown in Mumbai) केलंच पाहिजे.

मुंबईतील रुग्णालयात रुग्णांचं आयुष्य धोक्यात, रात्री उशिरा नेमकं काय घडलं?

शुक्रवारी चोवीस तासांमध्ये राज्यात 63,729 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर, 398 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे कोरोनाच्या प्रसारापासूनचे सर्वाधिक आकडे आहेत. शुक्रवारी समोर आलेल्या नव्या रुग्णांच्या संख्येनंतर राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 37,03,584 वर पोहोचली आहे. तर, मृत्यूचा आकडा 59,551 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 30,04,391 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, तर 6,38,034 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

मुंबईमध्ये शुक्रवारी कोरोना रुग्णसंख्येत किंचित घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत शुक्रवारी 8839 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे, तर 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत तब्बल 5,61,998 लोक कोरोनाच्या विळख्यात आले आहेत.

First published:

Tags: Corona updates, Lockdown, Mumbai Mayor, Mumbai News