मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

आज शिंदे सरकारची खरी परीक्षा; बहुमत चाचणीसाठी ठरली रणनीती, मॅजिक फिगर गाठणार का?

आज शिंदे सरकारची खरी परीक्षा; बहुमत चाचणीसाठी ठरली रणनीती, मॅजिक फिगर गाठणार का?

फ्लोर टेस्टसाठी सरकारची रणनीती काय असेल यावर सर्व आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चा झाली. मात्र, फ्लोअर टेस्टपूर्वी भाजप-शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची सभापतीपदी निवड झाल्यानंतर सरकारला मॅजिक फिगर मिळविण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याचं दिसत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Kiran Pharate
मुंबई 04 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणात 10 दिवसांच्या बंडखोरीनंतर मोठा बदल घडवणारे शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde Government) यांच्या नव्या सरकारची आज फ्लोर टेस्ट होणार आहे. विधानसभेच्या फ्लोअर टेस्टपूर्वी (Floor Test) रविवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांसोबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या कोट्यातील सर्व आमदारही सहभागी होते. ठाकरेंना पुन्हा एक धक्का! मध्यावधी निवडणुका लागणार, पवारांचं भाकित, संजय पांडेंना ईडीचे समन्स TOP बातम्या फ्लोअर टेस्टपूर्वी भाजप-शिंदे गटाच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांची नेतेपदी निवड केली आहे. रविवारी विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बहुमताने निवड झाली आहे. त्यांनीही शिंदे यांना विधीमंडळ गटनेते म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे अजय चौधरी यांचे गटनेतेपद रद्द झालं. शिंदे यांच्या गटनेतेपदाला मान्यता दिली असल्यामुळे भरत गोगावले हेच मुख्य प्रतोद असल्याचं मान्य करण्यात आलं आणि शिवसेनेचे सुनील प्रभू यांना दिलेलं मुख्य प्रतोदपद रद्द करण्यात आलं. विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी शिवसेना-भाजप युती सरकारची फ्लोर टेस्ट होणार आहे, असं एका आमदाराने मुंबईच्या हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीबाबत सांगितलं. फ्लोर टेस्टसाठी सरकारची रणनीती काय असेल यावर सर्व आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चा झाली. मात्र, फ्लोअर टेस्टपूर्वी भाजप-शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची सभापतीपदी निवड झाल्यानंतर सरकारला मॅजिक फिगर मिळविण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याचं दिसत आहे. एकनाथ शिंदे पुन्हा जिंकले; ठाकरेंना जबर धक्का; शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदाबाबत मोठा निर्णय बहुमत चाचणीत सरकार नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला. विधानसभेत आज पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीप्रमाणे उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीमध्ये देखील सरकार नक्की यशस्वी ठरेल अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
First published:

Tags: Devendra Fadnavis, Eknath Shinde

पुढील बातम्या