Home /News /mumbai /

'मातोश्री'वर जाणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर

'मातोश्री'वर जाणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर

या शपथविधीनंतर नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. हा बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्व विचारसरणीचा आणि आनंद दिघे यांच्या शिकवणुकीचा विजय असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

    मुंबई 01 जुलै : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुरुवारी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि धर्मवीर आनंद दिघे (Aanand Dighe) यांना वंदन करुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे हे राज्याचे 20 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. मुंबईतील राजभवनात दरबार हॉलमध्ये हा शपथविधी कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. एकनाथ शिंदे यंच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांचा विषय, विशेष अधिवेशनाचा निर्णय या शपथविधीनंतर नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. हा बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्व विचारसरणीचा आणि आनंद दिघे यांच्या शिकवणुकीचा विजय असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे गुरुवारी रात्री उशिरा गोव्यात पोहोचले आणि पणजीतील ताज हॉटेलमध्ये त्यांनी बंडखोर आमदारांची भेट घेतली. यावेळी आमदारांनी एकनाथ शिंदे यांचं जंगी स्वागत केलं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडणारे शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्यातच आहेत आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी ते उद्या मुंबईत येतील येऊ शकतात. शिंदे म्हणाले की, आमच्याकडे (भाजप आणि बंडखोर) 175 आमदार असल्याने फ्लोअर टेस्ट ही केवळ औपचारिकता आहे आणि ती आम्ही सहज जिंकणार आहे. “आमच्याकडे 175 चा आकडा आहे, त्यामुळे चित्र स्पष्ट आहे”. दरम्यान तुम्ही मातोश्रीवर जाणार का, याबाबत प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदे म्हणाले की मी ‘मातोश्री’ला भेट कधी देणार हे वेळ आल्यावर लोकांना कळेलच. महाविकास आघाडी सरकार कोसळलं; शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अधिकाऱ्यांना उद्देशून महत्त्वाचं विधान केलं. "आपण नवीन सुरुवात करत आहोत. आपल्यासोबत अनुभवी उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यामुळे कारभार करण्यास अडचण येणार नाही राज्यातील विकास कामे विविध प्रकल्प आणि समाज घटकाला न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम करावे लागते ही एका रथाची दोन चाके आहेत लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तो सार्थ ठरवायाचा आहे. आपल्या कामातून गती किमान शासन प्रशासन आहे. असा संदेश जाणे मेट्रो समृद्धी महामार्ग जलसंपदा विभागांचे महत्त्वाचे प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावयाचे आहेत त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य मिळेलच, हा विश्वास आहे", असं एकनाथ शिंदे हे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद साधताना म्हणाले.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या