मुंबई, 1 जुलै : महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळताच राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना आयकर विभागाची (Income Tax Department) नोटीस आल्याच्या याच्या टायमिंगची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 2004, 2009, 2014 आणि 2020 मध्ये दाखल केलेल्या निवडणूक शपथपत्रांसंदर्भात आयकर विभागाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नोटीस पाठवली आहे.
Income Tax department has sent a notice to NCP chief Sharad Pawar in connection with poll affidavits filed in 2004, 2009, 2014, and 2020.
— ANI (@ANI) July 1, 2022
(File photo) pic.twitter.com/HDqncI5T0f
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं रात्री उशिरा गोव्यात जंगी स्वागत; आमदारांच्या जल्लोषाचा नवा VIDEO एकीकडे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि दुसरीकडे शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस आली. त्यामुळे या नोटीसीची चर्चा आता सुरु झाली आहे. आधीच केंद्र सरकारकडून केंद्रीय संस्थांचा गैरवापर सुरु असल्याचा आरोप होत असताना या कारवाईमुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्याकडे बोट केलं आहे. संजय राऊतही ईडी चौकशीला हजर राहणार पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज ईडीकडून चौकशी होणार आहे. या चौकशीला हजर राहण्यापूर्वी राऊत पत्रकारांशी बोलत होते. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ईडीच्या कार्यलयाबाहेर येऊ नका, असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं. ईडीचा वापर राजकीय सोयीसाठी होत असल्याचा आरोप करत तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.