जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / चंद्रकांत पाटील म्हणतात, "उद्धव ठाकरेंच्या मनात आलं तर मुख्यमंत्रिपदाचा चार्ज..."

चंद्रकांत पाटील म्हणतात, "उद्धव ठाकरेंच्या मनात आलं तर मुख्यमंत्रिपदाचा चार्ज..."

चंद्रकांत पाटील म्हणतात, "उद्धव ठाकरेंच्या मनात आलं तर मुख्यमंत्रिपदाचा चार्ज..."

CM Uddhav Thackeray: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनात उपस्थित नाहीयेत. प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री अनुपस्थित असले तरी ते कधीही अधिवेशनात उपस्थित राहतील अशी माहिती शिवसेनेच्या नेत्यांकडून देण्यात येत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 डिसेंबर : आजपासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन (Maharashtra Assembly winter session) सुरू झाले आहे. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित नाहीयेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अनुपस्थितीवरुन भाजपने जोरदार टोलेबाजी केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, त्यांनी चार्ज कुणाला तरी द्यावा. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर त्यांचा विश्वास नाहीये, हे स्वाभाविक आहे. कारण चार्ज घेतला तर सोडणारच नाही. आदित्य ठाकरेंकडे चार्ज द्यावा. राज्याला मुख्यमंत्री नाही, सभागृहाला मुख्यमंत्री नाही. सह्या करायला मुख्यमंत्री नाही ही स्थिती राज्याच्या हिताची नाही. चंद्रकातं पाटील म्हणाले, रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्याकडे थेट चार्ज देता येणार नाही. आधी त्यांना मुख्यमंत्री करावं लागेल. ज्याने शपथ घेतली आहे अशाच व्यक्तीकडे चार्ज द्यावा लागतो. रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करायला काही हरकत नाही पण त्यासाठी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागेल. उद्धव ठाकरेंच्या मनात आलं तर रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करु शकतात असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टोला लागावला आहे. वाचा :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्याची ED कडून चौकशी; काय आहे प्रकरण? रवींद्र वायकर म्हणाले… भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, आज अधिवेशनात खूप मुद्दे आहेत. प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या वीजेची कनेक्शन तोडले जात आहेत. वादळामुळे हैराण आहेत. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आम्ही प्रश्न उपस्थित करणार आहोत. परीक्षा पेपरफुटीचे प्रकरण, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, महिला अत्याचाराचे सुद्धा प्रश्न आहेत. काल चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. हे सरकार रोखशाही आणि रोकशाही सरकार आहे. या सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रात भ्रष्टाचार, गुन्हेगारी, बलात्कार, संप, आंदोलने जितक्या प्रमाणात होत आहे, तितकी यापूर्वी कधीही झाली नव्हती. या सरकारच्या मनमानी कारभारामुळेच महाराष्ट्रात प्रत्येक समाजघटकावर आत्महत्येची वेळ आली आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. वाचा :  हिवाळी अधिवेशन: आक्रमक विरोधकांना रोखण्यासाठी ठाकरे सरकारची रणनीती ठरली ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांच्या समस्या, महिला सुरक्षा, विद्यार्थ्यांचे प्रश्न, कायदा आणि सुव्यवस्था अशा प्रत्येक क्षेत्रातील या सरकारच्या नाकर्तेपणाबाबत आम्ही प्रश्न विचारणार आहोत. विरोधकांनी नामोहरम करू नये, यासाठीच न घडलेल्या घटनांचे दाखले देत आमच्या 12 आमदारांना निलंबित केले आहे. 170 आमदारांचा पाठींबा असल्याचे सांगत असले, तरीही यांना आपल्याच आमदारांविषयी देखील विश्वास वाटत नाही. म्हणूनच या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीचा नियम डावलून होणार आहे. नियम समितीचे नियम डावलण्यात आल्यास त्याचा आम्ही तीव्र निषेध करू असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात