मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्याची ED कडून चौकशी; काय आहे प्रकरण? रवींद्र वायकर म्हणाले...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्याची ED कडून चौकशी; काय आहे प्रकरण? रवींद्र वायकर म्हणाले...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्याची ED कडून चौकशी; काय आहे प्रकरण? रवींद्र वायकर म्हणाले...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्याची ED कडून चौकशी; काय आहे प्रकरण? रवींद्र वायकर म्हणाले...

Shiv Sena leader Ravindra Waiker on ED interrogations: शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांची ईडीकडून काल चौकशी करण्यात आली. ईडीकडून करण्यात आलेल्या या चौकशी संदर्भात स्वत: रवींद्र वायकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 22 डिसेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय असलेले शिवसेना आमदार रवींद्र वायकर (Shiv Sena MLA Ravindra Waikar) यांची काल ईडीने चौकशी (ED inquiry) केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आमदार रवींद्र वायकर यांची तब्बल आठ तास चौकशी केली. नेमकी कोणत्या प्रकरणात ही चौकशी करण्यात आली याबाबत माहिती समोर आली नव्हती. पण आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदार रवींद्र वायकर यांना या ईडी चौकशी संदर्भात विचारलं असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले रवींद्र वायकर? न्यूज 18 लोकमत सोबत बोलताना रवींद्र वायकर म्हणाले, ईडीच्या अधिकाऱ्यांना काही शंका होत्या आणि त्या संदर्भात त्यांनी बोलावले होते. त्या संदर्भात त्यांनी प्रश्न विचारले आणि मी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांच्या शंकांचे निरसण झालं. कोणत्या शंका होत्या या संदर्भात विचारले असता रवींद्र वायकर म्हणाले कोणत्या शंका होत्या हे मी सांगू शकत नाही. मी 3-4 तास ईडी कार्यालयात होतो आणि सर्व रिलॅक्समध्ये सुरू होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याने तुम्हाला अधिवेशनाच्या एकदिवसआधी चौकशी साठी बोलावलं असं वाटतं का? यावर रवींद्र वायकर म्हणाले असं असू शकतं. किरीट सोमय्या यांनी काही आरोप करत कागदपत्रे सादर केली होती त्यावरमुळे ईडीने चौकशीसाठी बोलावले होते का? यावर रवींद्र वायकर म्हणाले, तसं काहीही नाहीये. ईडीच्या अधिकाऱ्यांचं पूर्ण समाधान झालं आहे आणि मला ते पुन्हा बोलावणार नाहीयेत. वाचा : Maharashtra Winter session: आक्रमक विरोधकांना रोखण्यासाठी ठाकरे सरकारची रणनीती ठरली ईडीकडून 8 तास चौकशी काही महिन्यांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्या पत्नीच्या नावाचा उल्लेख करत जमिनीबाबत गंभीर आरोप केले होते. त्यानंतर वायकर यांनी सोमय्यांना मानहानीची नोटीस पाठवली होती. या सर्व घडामोडींनंतर आज अचानक वायकरांची ईडी चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ईडीकडून वेगवेगळ्या प्रकरणांवरुन रवींद्र वायकरांची चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे याआधी देखील शिवेसेनेच्या काही नेत्यांना ईडीच्या ससेमिऱ्याला सामोरं जावं लागलं आहे. यामध्ये भावना गवळी, प्रताप सरनाईक, आनंदराव अडसुळ या शिवसेना नेत्यांचा समावेश आहे. रवींद्र वायकर मातोश्री क्लब, शिवछत्रपती संस्थान अशा विविध संस्थांचे ते पदाधिकारी आहेत. या दरम्यान मातोश्री क्लबमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप रवींद्र वायकर यांच्यावर करण्यात आला होता. अशा पद्धतीच्या काही वेगवेगळ्या आरोपांवरुन ईडीने वायकरांची आठ तास चौकशी केली असल्याचं बोललं जात आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Maharashtra, Shiv sena, Winter session

पुढील बातम्या