जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मंत्रिमंडळ विस्ताराचा दिल्लीत निघणार तोडगा? शिंदे-फडणवीस शहांच्या भेटीला

मंत्रिमंडळ विस्ताराचा दिल्लीत निघणार तोडगा? शिंदे-फडणवीस शहांच्या भेटीला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 जानेवारी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहे. या दौऱ्यात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहांसोबत बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत त्यांची बैठक होणार आहे. राज्यातील विकास कामांबाबतही यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्नही मार्गी लागण्याची चिन्ह आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी मुंबईमध्ये येऊन गेले. त्यानंतर लगेच मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस हे दिल्लीला पोहोचले आहे. त्यामुळे भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. (‘बाळासाहेबांनी दाखवलेल्या विश्वासाचा अपमान करू नका’, तैलचित्रकार चंद्रकला कदम नाराज, Video) शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर 19 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. शिवसेनेचं पक्षचिन्ह कुणाला मिळणार याचा फैसला अजून निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. तर सुप्रीम कोर्टामध्येही सुनावणी सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात सुप्रीम कोर्टात राज्याच्या सत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे. (राणेंचं भाषण, नीलम गोऱ्हेंचा आक्षेप, भुजबळांचा हात, विधानभवनातल्या गोंधळाचा Video) या सगळ्या घडामोडीमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा शुभारंभ नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मुंबईत मेट्रोसह सिमेंट क्राँक्रिटीकरण रस्त्याचे लोकार्पण करण्यात  आले आहे.  मुंबई पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून पहिले पाऊल पुढे टाकले आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झाले असून राज्यातील समस्यांवर काय तोडगा काढणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात