मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'देवेंद्र फडणवीस पुन्हा येतील, तुम्ही पण या', भाजप नेत्याची अजितदादांना सभागृहात ऑफर

'देवेंद्र फडणवीस पुन्हा येतील, तुम्ही पण या', भाजप नेत्याची अजितदादांना सभागृहात ऑफर

 'कुछ देर की खामोशी है, फिरसे शोर आयेगा, तीन महिने की दूरी है, फिरसे हमारा दौर आयेगा' असं सूचक विधान...

'कुछ देर की खामोशी है, फिरसे शोर आयेगा, तीन महिने की दूरी है, फिरसे हमारा दौर आयेगा' असं सूचक विधान...

'कुछ देर की खामोशी है, फिरसे शोर आयेगा, तीन महिने की दूरी है, फिरसे हमारा दौर आयेगा' असं सूचक विधान...

मुंबई, 10 मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget 2021) सत्ताधारी विरुद्ध भाजप (BJP) असा जोरदार सामना रंगला. भाजपच्या आक्रमक बाण्यामुळे महाविकास आघाडी सरकारला (MVA Government) बॅकफूटवर जावे लागले.  'महाराष्ट्र वाचवण्यासाठी जी ताकद लावायची ती लावा, पण देवेंद्रजी तुम्हाला पुन्हा यावंच लागेल, अजितदादा (Ajit Pawar) तुम्ही पण या हरकत नाही' अशी ऑफरच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली.

अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार भाषण करत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

'आम्ही वैधानिक मंडळांचा आग्रह करत होतो. यांनी आमची कवचकुंडलं काढली. विदर्भ आणि मराठवाड्याचा 1 टक्के निधी कमी केला. दादा तुम्ही अधिकाऱ्यांवर विसंबून राहू नका', असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.

नाना पटोले हे मध्येच बोलायला उभे राहिले असता 'आता तुम्ही महाराष्ट्राचे पप्पू होऊ नका' असा सणसणीत टोलाच मुनगंटीवार यांनी लगावला.

'आम्हाला भारताविरुद्ध खेळवा', केव्हिन पीटरसनची निवड समितीकडं मागणी

'मला प्रश्न पडला आहे की, अजितदादा तुमच्यावर टीका करायची का नाही. कारण पुन्हा तुम्ही कधी मित्र व्हाल. महाराष्ट्र वाचवण्यासाठी जी ताकद लावायची ती लावा, देवेंद्रजी तुम्हाला पुन्हा यावंच लागेल. अजितदादा तुम्ही पण या हरकत नाही, अशी ऑफरच मुनगंटीवार यांनी दिली.

तसंच, 'कुछ देर की खामोशी है, फिरसे शोर आयेगा, तीन महिने की दूरी है, फिरसे हमारा दौर आयेगा' असं सूचक विधानही मुनगंटीवार यांनी केलं.

'महात्मा गांधी सेवा अनुदानासाठी 25 हजारांची तरतूद केली आहे. आज गांधीजी असते तर ते हाताची काठी घेऊन मागे लागले असते. राज्यात पहिल्यांदाच दरडोई उत्पन्न कमी झालं आहे', अशी टीकाही मुनगंटीवार यांनी केली.

Explainer: काय आहे Maternity Benefit Act? मातृत्व रजेचे फायदे काय जाणून घ्या

'अनिल देशमुख यांचं वक्तव्य दुर्देवी होतं. ठाकरे सरकारला ठार करे सरकार करायचं आहे का? काही पक्षांचे चीन वर प्रेम आहे काही जणांचे सचिनवर (वाझे) प्रेम आहे. हे सरकार शरम प्रुफ आहे. आरोपींना वाचवण्यासाठी विदर्भातल्या माणसाला गृहमंत्रिपद दिले, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला.

त्यानंतर अनिल देशमुख बोलायला उभे राहिले,  'मुनगंटीवार यांनी सगळ्या मंत्र्यांची नावं घेतली. पणतुम्ही देवेंद्रजींपेक्षा सीनियर होतात पण मुख्यमंत्री ते झाले. तुमच्या मनातलं दुःख मला कळत होतं. तुम्ही खोटं हसून ते सांभाळत होतात. तुम इतका क्यू मुस्करा रहे हो ? क्या गम है जिसको छुपा रहे हो' असा टोला अनिल देशमुख यांनी मुनगंटीवार यांना लगावला.

First published:
top videos

    Tags: BJP, Devendra Fadnavis, Sudhir mungantivar