Home /News /sport /

'आम्हाला भारताविरुद्ध खेळवा', केव्हिन पीटरसनची निवड समितीकडं मागणी

'आम्हाला भारताविरुद्ध खेळवा', केव्हिन पीटरसनची निवड समितीकडं मागणी

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज 2021 ( Road Safety World Series 2021) मधील एका चुरशीच्या मॅचमध्ये इंग्लंड लिजेंड्सने भारत लिजेंड्सचा 6 रनने पराभव केला.

  रायपूर, 10 मार्च : रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज 2021 (Road Safety World Series 2021) मधील एका चुरशीच्या मॅचमध्ये इंग्लंड लिजेंड्सने भारत लिजेंड्सचा 6 रनने पराभव केला. 40 वर्षांच्या केव्हिन पीटरसनची (Kevin Pietersen) आक्रमक खेळी हे या मॅचचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. पीटरसनने फक्त 37 बॉलमध्ये 75 रन काढले. त्याच्या खेळाच्या जोरावर इंग्लंडच्या टीमने 20 ओव्हरमध्ये 7 आऊट 188 रन केले होते. पीटरसननं या मॅचमध्ये भारतीय बॉलर्सची चांगलीच धुलाई केली. त्याने फक्त 18 बॉलमध्ये अर्धशतक झळकावले. या खेळीच्या दरम्यान त्याने सहा फोर आणि पाच सिक्स टोलावले. 189 रनचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) फक्त 6 रन काढून आऊट झाला. तर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) फक्त 9 रन काढता आले. सचिनची मोठी विकेट माँटी पानेसरने घेतली.  भारताकडून इरफान पठाणने 34 बॉलमध्ये नाबाद 61 रन काढले. मनप्रीत गोनीने फक्त 16 बॉलमध्ये 35 रन काढत मॅच रंगतदार अवस्थेत आणली होती. मात्र ही जोडी भारताला विजय मिळवून देऊ शकली नाही. (हे वाचा-IPL 2021 : आयपीएलमधून मिळणाऱ्या पैशांबाबत बटलरचे मोठे वक्तव्य, म्हणाला...) या विजयानंतर इंग्लंड लिजेंड्स टीमचा कॅप्टन केव्हिन पीटरसन याने इन्स्टाग्रामवर एक मेसेज लिहिला आहे. जो सध्या व्हायरल (Viral) होत आहे. पीटरसनने ड्रेसिंग रुममधील एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये टीममधील सर्व खेळाडू दिसत आहेत. ' इंग्लंड भारताला भारतामध्ये हरवू शकतो.काय जबरदस्त मॅच होती.  इंग्लड सिलेक्टर्स, आम्ही सर्व भारताविरुद्धच्या मालिकेसाठी उपलब्ध आहोत.' असे पीटरसनने इंग्लंडच्या निवड समितीला सुचवले आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Kevin Pietersen (@kp24)

  पीटरसनचे रोड सेफ्टी मालिकेतील हे सर्वात जलद अर्धशतक आहे. यापूर्वी त्याने बांगलादेश लिजेंड्स विरुद्धही आक्रमक 42 रन काढत टीमला विजय मिळवून दिला होता. (वाचा : IPL 2021 : आयपीएलमधून मिळणाऱ्या पैशांबाबत बटलरचे मोठे वक्तव्य, म्हणाला...) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका भारताने 3-1 या फरकाने जिंकली आहे. तर पाच मॅचच्या टी20 मालिकेला शुक्रवारपासून अहमदाबादमध्ये सुरुवात होत आहे. या मालिकेनंतर तीन मॅचची वन-डे मालिका पुण्यामध्ये खेळवली जाणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Cricket, India vs england, Social media viral, Sports

  पुढील बातम्या