Home /News /explainer /

Explainer: काय आहे Maternity Benefit Act? मातृत्व रजेचे फायदे काय जाणून घ्या

Explainer: काय आहे Maternity Benefit Act? मातृत्व रजेचे फायदे काय जाणून घ्या

हॉस्पिटल मध्ये जाताना काही खास तयारी करावी लागते.

हॉस्पिटल मध्ये जाताना काही खास तयारी करावी लागते.

मॅटर्निटी लीव्हनंतर राजीनामा देता येतो का, मातृत्व रजेचे नियम काय? मातृत्व कायद्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. उच्च न्यायालयीन वकील प्राची मिश्रा यांनी.

दिल्ली, 10 मार्च: महिलांनी आता सर्व क्षेत्रांत आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. त्यांच्या कार्यक्षमतेवर किंवा करिअरवर परिणाम करणारा एक मोठा शारीरिक घटक म्हणजे गर्भारपण; मात्र त्या काळातही महिलांचं आर्थिक नुकसान न होता त्यांची नोकरी टिकून राहण्यासाठी आणि त्यांना वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक तेवढी रजा भरपगारी देण्याची तरतूद मातृत्व लाभ कायद्यात आहे. त्या कायद्याविषयी जाणून घेऊ या. - मॅटर्निटी बेनिफिट अॅक्ट 1961 (Maternity Benefit Act) अर्थात मातृत्व लाभ कायदा कोणाला लागू होतो? - प्रत्येक फॅक्टरी, खाण किंवा लागवड (सरकारी आस्थापनांसह), तसंच अॅक्रोबॅटिक आणि अश्वारोहणाचे प्रदर्शन करणारी संस्था, तसंच 10 किंवा त्याहून अधिक व्यक्ती नोकरीला असलेलं किंवा गेल्या 12 महिन्यांत नोकरीला ठेवण्यास सुरुवात केलेलं कोणतंही दुकान किंवा संस्था यांना मॅटर्निटी बेनिफिट अॅक्ट (1961) लागू होतो. या संस्थांनी त्यांच्याकडे असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना या कायद्यानुसार लाभ देणं बंधनकारक असतं. - एखाद्या महिलेला मातृत्व लाभ कायद्याचा लाभ मिळण्यासाठीचे निकष कोणते आहेत? - संबंधित महिलेने संबंधित संस्थेत मागील 12 महिन्यांत किमान 80 दिवस काम केलेलं असलं पाहिजे किंवा तिचा संबंधित संस्थेतला कार्यकाळ किमान 80 दिवसांचा असला पाहिजे. तरच त्या महिलेला या कायद्याचा लाभ मिळू शकतो. - संबंधित महिलेचा गर्भपात (Miscarriage) झाल्यास काय नियम आहेत? - गर्भपातासंदर्भात निर्णय घेण्यासाठी या कायद्याच्या कलम 6, 9 आणि 10चा आधार घ्यावा लागतो. कलम 6नुसार अशा महिलेला 26 आठवड्यांची रजा मिळू शकते. त्यातील आठहून अधिक आठवडे तिच्या प्रसूतीच्या अपेक्षित तारखेच्या आधीचे असू नयेत. - गर्भवती असताना महिलेला कामावरून काढून टाकण्यासंदर्भातले नियम काय आहेत? - या कायद्याच्या कलम 12मध्ये दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला गर्भधारणेच्या कारणामुळे गैरहजर राहिली असेल, तर तिला कामावरून काढून टाकण्यास किंवा तिच्या नोकरीच्या नियमांमध्ये बदल करण्यास कायदा प्रतिबंध करतो. गर्भारपणाच्या काळात तिला कामावरून काढून टाकण्यात आलं, तरी ती मॅटर्निटी बेनिफिट किंवा मेडिकल बोनसचा दावा करू शकते. अर्थात, तिची वागणूक चांगली नसल्याने कामावरून काढून टाकण्यात आलं असेल, तर ही अट लागू होत नसल्याचंही कलम 12मध्ये म्हटलं आहे. (हे वाचा: Explainer: फेक न्यूज म्हणजे काय? बातमीची सत्यता कशी तपासायची  ) मातृत्वविषयक आर्थिक लाभ - आर्थिक लाभांसंदर्भात आपल्याला या कायद्याच्या कलम 6(5)चा आधार घ्यावा लागतो. संबंधित महिलेच्या अपेक्षित प्रसूती तारखेच्या आधीच्या कालावधीचे आर्थिक लाभ आगाऊ देण्यात यावेत. तसंच प्रसूती तारखेनंतरच्या कालावधीचे आर्थिक लाभ आवश्यक (सांगण्यात आलेला) पुरावा सादर केल्यानंतर 48 तासांत देण्यात यावेत. पाळणाघराच्या सुविधेचा (Creche Facility) नियम काय सांगतो? - 50 किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेली कंपनी किंवा शाखा यांच्यापासून प्रस्तावित अंतरात पाळणाघराची सुविधा असणं गरजेचं असतं. पाळणाघरं स्वतंत्र किंवा कॉमन सुविधा असलेली असू शकतात. - मातृत्व लाभ घेतल्यानंतर राजीनामा (Resignation) देण्यावर काही बंधन आहे का? - मातृत्व लाभ घेतल्यानंतर संबंधित महिलेने लगेचच राजीनामा देण्यावर कोणतंही बंधन नाही.
First published:

Tags: India, Mother, Wellness

पुढील बातम्या