जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / BREAKING : 10 वी आणि 12वीच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना

BREAKING : 10 वी आणि 12वीच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना

Board exam

Board exam

महाराष्ट राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने परिपत्रक काढत विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची सूचना दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 मार्च : राज्यात कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, पुढील महिन्यात होणारी  दहावी (Class X SSC board exam timetable) आणि बारावीच्या परीक्षा  (HSC Class xii exam date) ठरलेल्या वेळीच होणार, असल्याचे माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाने  (Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education) स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी अफवाना बळी पडू नये, असं आवाहनही मंडळाने केले आहे. महाराष्ट राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने परिपत्रक काढत विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची सूचना दिली आहे. कोविड संसर्गाच्या काळात परीक्षा सुरक्षित घेण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन सुरू आहे. मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही तारखात सध्या बदल नाहीत, असं शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ममता सरकारचा पराभव पक्का’, मोदींचा दावा! ‘खेला होबे’ घोषणेलाही दिलं उत्तर या वर्षी कोविडमुळे (coronavirus)शालेय वर्ष उशीरा सुरू झालं आणि परीक्षाही लांबल्या. पुण्या-मुंबईत तर अद्याप शाळासुद्धा सुरू झालेल्या नाहीत. पण परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. यंदाच्या वर्षी 12वीची परीक्षा 23 एप्रिलपासून सुरू होईल तर 21 मे रोजी 12वीचा शेवटचा पेपर असेल, तर 10वीची परीक्षा 29 एप्रिल ते 29 मे या कालावधीमध्ये घेतली जाईल. 10वीच्या परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आणि 12वी च्या परिक्षांचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस लागणार आहे. भारतात अवैधरित्या राहाणाऱ्या पाच बांगलादेशींना न्यायालयानं सुनावली कठोर शिक्षा मागच्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे शाळा आणि कॉलेज सुरू झाली नव्हती, त्यामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा उशीरा सुरू होणार आहेत. मार्च महिन्यापासूनच राज्यात कोरोनाने डोकं वर काढल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचा भुगोलाचा पेपर झाला नव्हता, अखेर राज्य सरकारने हा पेपर रद्द करत विद्यार्थ्यांना सरासरी मार्क देण्याची घोषणा केली होती. कोरोनाची लागण झालेल्या किंवा क्वारंटाइनमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी आधीच दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात