पुरुलिया (पश्चिम बंगाल) 18 मार्च : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Election 2021) पहिल्या टप्प्याला आता 10 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांच्या प्रचाराने जोर पकडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही बंगालमधील निवडणूक प्रचारात भाग घेतला. पुरुलिया (Purulia) येथील प्रचार सभेत बोलताना मोदींनी बंगालमधील ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सरकारवर जोरदार टीका केली. या निवडणुकीत ममता सरकारचा पराभव नक्की आहे. या सरकारचे आता मोजकेच दिवस शिल्लक आहेत, असा दावा त्यांनी केला. त्याचबरोबर ममता दीदींच्या ‘खेला होबे’ (खेळ सुरु) या घोषणेलाही मोदींनी या प्रचारसभेत उत्तर दिले. पुरुलियातील प्रश्नांचा पाढा मोदींनी या सभेत पुरुलियातील प्रश्नांचा पाढा वाचला. पुरुलियाचा श्रीराम आणि सीतामाई यांच्याशी जुना संबंध आहे. त्या पुरुलियालत आज पाणी टंचाईची भीषण समस्या आहे. या लोकांनी पुरुलियातील नागरिकांना पाणी टंचाई, पलायन, पक्षपाती शासन दिलं. आज या लोकांमुळेच पुरुलियाचा देशातील सर्वात मागास भागांमध्ये समावेश होतो, असा आरोप मोदींनी केला. ‘खेला होबे’ घोषणेला उत्तर पंतप्रधान मोदींनी यावेळी ममता बॅनर्जी यांची मुख्य घोषणा असलेल्या ‘खेला होबे’ (खेळ सुरु) याला उत्तर दिलं. दीदी खेला होबे असं म्हणत आहेत. तर भाजपाची विकास होबे, शिक्षा होबे, स्कूल होबे, , हॉस्पिटल होबे, सोनार बांगला होबे,’ ही घोषणा आहे, असं उत्तर मोदींनी दिलं.
#WATCH: Prime Minister Narendra Modi, in Purulia, says, "Didi bole khela hobe, BJP bole chaakri hobe. Didi bole khela hobe, BJP bole vikas hobe. Didi bole khela hobe, BJP bole shiksha hobe....Khela shesh hobe, vikas aarambh hobe."#WestBengalElections2021 pic.twitter.com/9a4e7fBTr8
— ANI (@ANI) March 18, 2021
(हे वाचा- TMC ला मोठा धक्का, आणखी एक संस्थापक सोडणार पक्ष ) ‘ममता दीदींना पराभवाची भीती’ ‘गेली 10 वर्ष लांगूलचालनाचं राजकारण केल्यानंतर आणि लोकांवर काठी चालवल्यावर दीदी अचानक बदलल्या आहेत. हे हृदय परिवर्तन नाही, तर पराभवाची भीती आहे,’ असा दावा मोदींनी केला. बंगालमधील जनतेची नाराजी दीदींना हे सर्व करण्यासाठी भाग पाडत आहे, पण बंगाली लोकांची स्मरणशक्ती चांगली आहे, हे विसरु नका, असेही मोदींनी या सभेत बजावले.