जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / भारतात अवैधरित्या राहात होते पाच बांगलादेशी, न्यायालयानं सुनावली कठोर शिक्षा

भारतात अवैधरित्या राहात होते पाच बांगलादेशी, न्यायालयानं सुनावली कठोर शिक्षा

भारतात अवैधरित्या राहात होते पाच बांगलादेशी, न्यायालयानं सुनावली कठोर शिक्षा

न्यायालयानं भारतात अवैधरित्या राहाणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना (5 Bangladeshi Nationals) शिक्षा सुनावली आहे. या पाच जणांना बनावट कागदपत्र आणि बनावट पासपोर्ट बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनऊ 18 मार्च : उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ न्यायालयानं भारतात अवैधरित्या राहाणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना (5 Bangladeshi Nationals) शिक्षा सुनावली आहे. न्यायालयानं पाच बांगलादेशींना दोषी ठरवत चार वर्षांचा तुरुंगवास आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या पाच जणांना बनावट कागदपत्र आणि बनावट पासपोर्ट बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलं होतं. एटीएस कोर्टात या सर्वांनी आपला गुन्हा मान्य केला आहे. 2019 मध्ये यूपी एटीएसनं या पाच जणांना अटक केली होती. शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावं हबीबुर्रहमान, जाकिर हुसैन उर्फ रोमी, मोहम्मद काबिल, कमालुद्दीन, ताइजुल इस्लाम अशी आहेत. यूपी एटीएसनं मे २०१९ मध्ये खोटे कागदपत्र आणि बनावट पासपोर्ट बाळगल्याप्रकरणी सहा बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं होतं. या सर्वांवर लखनऊच्या एटीएस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यूपी एटीएसनं जमा केलेल्या पुराव्यांनंतर हबीबुर्रहमान, कमालुद्दीन, काबिल, जाकिर आणि ताईजुल यांनी न्यायालयासमोर आपला गुन्हा मान्य केला. यानंतर न्यायालयांना पाचही दोषींना कलम 419, 420, 467, 468, 471 अंतर्गत दोषी ठरवत त्यांना चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तर, सहाव्या संशयिताविरोधात अद्यापही न्यायालयात सुनावणी सुरुच आहे. या नागरिकांमधील हबीबुर्रहमान बांगलादेशमधील मदारीपुर, जाकिर हुसैन नारायणगंज, मोहम्मद काबिल खानसामा, कमलालुद्दीन सिलेट आणि ताईजुल इस्लाम माइमान सिंह जिल्ह्याचा रहिवासी आहे. न्यायालयानं त्यांना कठोर शिक्षा सुनावल्यानंतर आता अवैधरित्या भारतात राहाणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात