मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईकरांनो, लग्न सोहळ्यात कोरोनाचे नियम मोडले तर होईल गुन्हा दाखल

मुंबईकरांनो, लग्न सोहळ्यात कोरोनाचे नियम मोडले तर होईल गुन्हा दाखल

जर 100 पेक्षा अधिक लोकं लग्नाला किंवा सोहळ्याला उपस्थित राहिले तर 188 अंतर्गत आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

मुंबई, 17 फेब्रुवारी : मुंबईमध्ये (Mumbai) कोरोनाची (Corona) परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे सर्व बाजारपेठा खुल्या करण्यात आल्या आहेत. पण, पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबई पालिकेनं (mumbai municipal corporation) लग्न सोहळे आणि कार्यक्रमांच्या हॉलवर कारवाई करणार आहे.

सध्या सर्वत्र लग्नाची धूम सुरू झाली आहे. लग्न सोहळ्याला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. पण, लग्न सोहळ्यात मास्क आणि शासकीय नियम पायदळी तुडवले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच  मुंबईतील लग्न सोहळे आणि कार्यक्रमांच्या हॉलवर कारवाई केली जाणार आहे.

‘तुझी आई करते तरी काय?’; बिग बींची नात ट्रोलर्सवर संतापली

जर 100 पेक्षा अधिक लोकं लग्नाला किंवा सोहळ्याला उपस्थित राहिले तर 188 अंतर्गत आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

लग्न किंवा कार्यक्रमांना किती लोक बोलवायचे हे आता आयोजक यांना काटेकोरपणे ठरवावे लागणार आहे अन्यथा  कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची मोठी घडामोड, पोलिसांनी 2 जणांना घेतले ताब्यात

मुंबईतील अशा लग्न सोहळे आणि हॉलवर पालिकेच्या टीमची बारीक नजर असणार आहे.  मुंबईतील कोरोनाच्या हॉटस्पॉट भागांत याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे.

लग्नसोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांवर सुद्धा मास्क न घातल्याची कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती आर उत्तर वॉर्डचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली.

First published:

Tags: BMC, Corona vaccine, Covid cases, Marriage, Mumbai, Strict precautions, Wedding