• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘तुझी आई करते तरी काय?’; बिग बींची नात ट्रोलर्सवर संतापली

‘तुझी आई करते तरी काय?’; बिग बींची नात ट्रोलर्सवर संतापली

तुझी आई काय करते? असा सवाल तिला नेटऱ्यांनी विचारला. या ट्रोलर्सला आता नव्याने देखील सडेतोड उत्तर दिल आहे. माझी आई काय करते? याच्याशी तुम्हाला काही देणं घेणं नाही असं प्रत्युत्तर तिनं दिलं.

 • Share this:
  मुंबई, 17 फेब्रुवारी: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिनं अद्याप सिनेसृष्टीत पदार्पण केलेलं नाही. मात्र तिची फॅन फॉलोइंग कुठल्याही लोकप्रिय कलाकारापेक्षा कमी नाही. अलिकडेच तिनं वोक्स मॅगझिनला एक मुलाखत दिली होती. मात्र या मुलाखतीवरुन तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. तुझी आई काय करते? असा सवाल तिला नेटऱ्यांनी विचारला. या ट्रोलर्सला आता नव्याने देखील सडेतोड उत्तर दिल आहे. माझी आई काय करते? याच्याशी तुम्हाला काही देणं घेणं नाही असं प्रत्युत्तर तिनं दिलं. मुलाखतीत नव्याला तिच्या कुटुंबाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ती म्हणाली घरात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसोबत मी लहानाची मोठी झाले आहे. अशा आशयाचं उत्तर तिनं दिलं. मात्र या उत्तरवरुन काही नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. जर तू घरातील मोलकरणींसोबत लहानाची मोठी झालीस तर तुझी काय करते? अशा आशयाचे सवाल करुन तिला ट्रोल केलं गेलं. यावर संतापलेल्या नव्याने आता सोशल मीडियाद्वारे प्रत्युत्तर दिलं आहे. अवश्य पाहा - जया बच्चन यांचं मोठ्या पडद्यावर पुनरागमन; पहिल्यांदाच करणार मराठी चित्रपटात काम “माझी आई एक लेखिका आहे. डिझायनर आहे. एक पत्नी आहे. आणि हो ती आपल्या मुलीचा सांभाळ करणारी एक आई देखील आहे. आई आणि पत्नी हा एक फुलटाईम जॉब आहे. हा जॉब करणाऱ्या महिलेला अनेक कर्तव्य पार पाडावी लागतात. घराची काळजी घेणाऱ्या अशा महिलांचा कृपया अपमान करु नका.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून तिनं ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिलं आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नाव्या ही बिग बींची मोठी मुलगी श्वेता हिची मुलगी आहे. नव्याला अभिनयात फारसा रस नाही. तिला आईप्रमाणेच एक फॅशन डिझायनर व्हायचं आहे. सध्या ती अमेरिकेत फॅनश डिझायनिंगचं शिक्षण घेत आहे. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. केवळ इन्स्टाग्रावरच तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. अनेकदा ती आपल्या आजोबांसोबतचे फोटो शेअर करते.
  Published by:Mandar Gurav
  First published: