मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची मोठी घडामोड, पोलिसांनी 2 जणांना घेतले ताब्यात

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची मोठी घडामोड, पोलिसांनी 2 जणांना घेतले ताब्यात

या प्रकरणी नेमण्यात आलेल्या पोलीस पथकाच्या टीमने  यवतमाळ आणि बीडमध्ये जाऊन दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी नेमण्यात आलेल्या पोलीस पथकाच्या टीमने यवतमाळ आणि बीडमध्ये जाऊन दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी नेमण्यात आलेल्या पोलीस पथकाच्या टीमने यवतमाळ आणि बीडमध्ये जाऊन दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

पुणे, 17 फेब्रुवारी : पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan suicide case) प्रकरणी पोलिसांनी (Pune Police) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी यवतमाळ आणि बीडमधून दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोन्ही तरुणांची कसून चौकशी केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी अखेर पुणे पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या पोलीस पथकाच्या टीमने  यवतमाळ आणि बीडमध्ये जाऊन दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या दोघांना सध्या चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यामध्ये एक जण हा अरुण राठोडचा नातेवाईक असल्याची माहिती मिळत आहे. मोठी बातमी, उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा बंगल्यावर भेट त्यामुळे या प्रकरणी आणखी नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे. अरुण राठोड हा गेल्या काही दिवसांपासून गायब आहे. कथित ऑडिओ क्लिपमध्ये अरुण राठोडचा आवाज असल्याचे सांगितले जात आहे. 'तो' आवाज माझ्या मुलाचा नाही, अरुणच्या आईचा खुलासा परंतु, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील संशयित अरुण राठोड याचं कुटुंब चार दिवसानंतर गावात आलं आहे. मात्र, त्यांच्यासोबत अरुण आलेला नाही. तो अजूनही गायबच आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अरुणच्या घरी लाखो रुपयांची चोरी झाली आहे. पूजा चव्हाणचा मित्र अरुण राठोड हा बीड जिल्ह्यातील परळीच्या धारावती तांडा येथे राहतो. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात व्हायरल क्लिपमुळे अरुणचं नाव आल्यानंतर त्याच्या घराला गेल्या काही दिवसांपासून कुलूप लावण्यात आलेलं होतं. या विषयी अरुणची आई मीराबाई सुभाष राठोड यांनी याबाबत खुलासा केला असून मीराबाई यांनी त्या ऑडिओ क्लिप मधील संभाषण हे अरुण राठोड व कथित मंत्री यांचे नसल्याच्या दावा या वेळी केला असून सध्या अरुण कुठे आहे हे त्याच्या आईला देखील माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.  भाजप नेत्याने दिला राजीनामा बीड जिल्ह्यातील अंबोजागाई तालुक्यातील काळवटी तांडा येथील सरपंच कमल नाथराव यांनी भाजपवरच गंभीर आरोप करत राजीनामा दिला आहे. भाजपचे अनेक नेते आणि वरिष्ठ मंडळी ही ओबीसी आणि बंजारा समाजातील उच्चपदस्थ संजय राठोड यांना संपवण्याचा कट रचला जात आहे. त्यामुळे आपण भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा देत आहे, असं नाथराव यांनी जाहीर केले आहे.  कमल नाथराव यांनी आपल्या पदाचा राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवला आहे. चंद्रकांत पाटील यांनी आपला राजीनामा स्वीकारावा अशी मागणीही त्यांनी केली. भाजपच्या नेत्यानेच ऑडिओ क्लिप केल्या व्हायरल गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणात तब्बल 12 ऑडिओ क्लीप समोर आल्या आहेत. या ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून व्हायरल झाल्या आहेत. त्यातून या क्लीप नेमक्या कशा बाहेर आल्या याबाबत विचारणा केली जात आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळीच भाजपच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने अरूण राठोडकडून या ऑडिओ क्लीप काढून घेतल्याचं समोर येत आहे. तसेच त्याचवेळी त्यांच्या फोटो आयडीचे फोटो काढून घेतल्याचं सांगितलं जात आहे. पण या प्रकरणी आता दबाव एवढा वाढू लागला आहे. याशिवाय ज्या कार्यकर्त्याने या क्लीप अरूण राठोडकडून घेतल्या तोदेखील आता माध्यमांसमोर येण्याचं टाळत आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: 2 arrested, Case reveal, Maharashtra, Mumbai, Pooja Chavan, Pune

पुढील बातम्या