पनवेल, 08 एप्रिल : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गुरुवारी दुपारी 'द बर्निंग BMW' चा थरार अनुभवायला मिळाला. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या बीएमडब्ल्यू कारला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पनवेल हद्दीत अचानक आग लागली. (Car caught fire on Mumbai Pune Express way) या आगीत कार जळून पूर्ण राख झाली. मात्र कारमधील चालकासह तिघेही बचावले आहेत. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. (The burning BMW)
गुरुवारी दुपारच्या सुमारास दोन जण मुंबईहून पुण्याकडे एका बीएमडब्यू कारमधून जात होते. त्यावेळी एक्स्प्रेसवेवरील किलोमीटर सहा जवळ असताना कारमधून धूर येत असल्याचं चालकाच्या लक्षात आलं. त्यानंतर चालकानं तत्काळ प्रसंगावधान राखत सर्विस लेनवर कार थांबवली आणि नेमकं काय झालं याची तपासणी चालक करू लागला. त्यावेळी वाहनांमधील वायरिंग जळत असल्याचं चालकाच्या निदर्शनात आलं. पण त्यानंतर काही क्षणांत आग वाढली आणि आगीनं एवढं रौद्र रूप धारण केलं की, त्यात कार पूर्णपणे जळून राख झाली.
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर Burning Car चा थरार; धावत्या BMW कार ने अचानक घेतला पेट. पनवेलच्या जवळ पुण्याकडे जाणाऱ्या लेनमध्ये ही घटना घडली. कार पूर्णपणे जळून राख झाली आहे. पण कारमधले तिघेही बचावले आहेत. #MumbaiPuneExpressWay pic.twitter.com/vPG6dTg1VP
— News18Lokmat (@News18lokmat) April 8, 2021
आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग पोलीस तसेच देवदूत यंत्रणा मदतीसाठी धावून आली. त्यानंतर आग विझवण्यात आली. पण तोपर्यंत बराच वेळ झाला होता त्यामुळं आगीत कारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं.
वाचा- कोरोना हाहाकारामुळे मुंबईची लाइफलाइनही होणार का बंद?
दरम्यान सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. आगीच्या घटनेदरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून पुण्याकडे जाणारी वाहतूक महामार्ग पोलिसांनी काही वेळासाठी थांबवली होती. त्यामुळं काही वेळासाठी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर काही वेळाने ही वाहतूक सुरळीत झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Burning car, Mumbai, Mumbai pune expressway, Panvel, Pune