मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /कोरोना हाहाकारामुळे मुंबईची लाइफलाइनही होणार का बंद? लोकलबद्दल वडेट्टीवारांनी दिले संकेत

कोरोना हाहाकारामुळे मुंबईची लाइफलाइनही होणार का बंद? लोकलबद्दल वडेट्टीवारांनी दिले संकेत

मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल सेवा पुन्हा एकदा बंद करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवारांनी यासंदर्भात सूतोवाच केलं आहे.

मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल सेवा पुन्हा एकदा बंद करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवारांनी यासंदर्भात सूतोवाच केलं आहे.

मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल सेवा पुन्हा एकदा बंद करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवारांनी यासंदर्भात सूतोवाच केलं आहे.

    मुंबई, 8 एप्रिल: गेल्या वर्षी कोरोनाव्हायरसचा प्रकोप (Coronavirus peak in Mumbai) सुरू झाला तेव्हा पहिल्या लॉकडाउनमध्ये मुंबईची (Lockdown restrictions) लाइफलाइन मानली गेलेली लोकल सेवा (mumbai local train news update) कित्येक महिने ठप्प होती. त्यानंतर काही निर्बंधांसह लोकल सुरू झाली. आता गेल्या वर्षीपेक्षाही भयंकर कोरोना परिस्थिती मुंबईत उद्भवली आहे. रुग्णसंख्या एवढी वाढली आहे की हॉस्पिटलमधले ICU बेड अपुरे पडू लागले आहेत. सद्यस्थितीचा विचार करता पुन्हा एकदा लोकल सेवा बंद करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी यासंदर्भात सूतोवाच केलं.

    वडेट्टीवार म्हणाले, "लोकल बंद करावी का याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. पण लोकल पूर्ण बंद करायची की मागच्या वेळी जसं लोकल सेवेला काही निर्बंध होते तसे घालायचे याबाबत विचार सुरू आहे." पहिल्या लॉकडाउनच्या वेळी लोकल सेवा ठप्प झाल्याने अनेकांचं मोठं नुकसान झालं. रोजगार बुडत होता म्हणून लोकल सुरू करण्याचा निर्णय मागच्या वर्षी घेतला गेला. आता कोरोना वाढतोय पण गर्दी काही कमी झालेली नाही. गर्दीमुळे कोरोनाची संख्या आणखी वाढते आहे. त्यावर लवकर विचार केला जाईल, असंही वडेट्टीवार म्हणाले.

    मुंबई लोकल सुरू करताना दिलेल्या सूचनेची मुख्यमंत्र्यांनी पुन्हा करून दिली आठवण

    यासंदर्भात राज्य सरकारने रेल्वेशी चर्चा केल्याचंही समजतं. पण लोकल सेवा बंद करण्याच्या बाजूने रेल्वे प्रशासन नाही. लोकांचा रोजगार बुडतो आणि गैरसोय होते. त्यामुळे लोकल सुरूच ठेवायला हव्यात, असं प्रशासनाचं म्हणणं आहे.

    राज्यात मिनी लॉकडाउन जाहीर करूनही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. दररोज नव्या विक्रमी संख्येने रुग्णवाढ होते आहे. त्यातच एका बाजूला लसीकरणही थंड पडलं आहे. पुरेशा लशींचा साठा नसल्याने काही ठिकाणची लसीकरण केंद्र बंद करावी लागत आहेत. दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हायचं नाव घेत नाही. त्यामुळे राज्याची परिस्थिती फारच बिकट झालेली आहे.

    दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही बुधवारच्या बैठकील मुंबई लोकल सुरू करण्यापूर्वी दिलेल्या सूचनांची आठवण करून दिली. उद्योजकांना गर्दी टाळण्याचं आवाहन त्यांनी केलं. त्यासाठी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे नियम करावे, असं ठाकरे म्हणाले.

    'बँका, खासगी कार्यालये यांनी वेळांची विभागणी करून वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करावे. वर्क फ्रॉम होम कार्यपद्धती अवलंबावी. मुंबई लोकल सुरू करतानाही ‘पिक’ हा शब्द काढून टाका असं सांगितलं होते. पिक अवर ऐवजी, चोवीस तास का नको? चोवीस तासांच्या विभागणीत काम करून गर्दी आणि विविध यंत्रणांवरील ताण टाळणे शक्य आहे. शिस्त पाळून काम करा. कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची जबाबदारी घ्या. त्यांच्या खाण्याची आणि येण्या-जाण्याची व्यवस्था यासाठी नियोजन करा. यासाठी चांगली एसओपी तयार करून ती सादर करण्यात यावी,' असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत दिले.

    First published:
    top videos

      Tags: Coronavirus, Lockdown, Mumbai, Mumbai local