Home /News /mumbai /

रात्री उशिरापर्यंत बार सुरू ठेवणाऱ्या हॉटेलवर BMCची धडक कारवाई, तब्बल 245 जण विना मास्क पकडले

रात्री उशिरापर्यंत बार सुरू ठेवणाऱ्या हॉटेलवर BMCची धडक कारवाई, तब्बल 245 जण विना मास्क पकडले

शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई केली आहे. तसंच एफआयआर सुद्धा दाखल करण्यात आला आहे.

    मुंबई, 18 मार्च : राज्यात कोरोनाबाधित (Coronavirus Cases in Maharashtra) रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. पण अशाही परिस्थितीत लोकांकडून कोरोना नियमांची (COVID-19 Restrictions) पायमल्ली केली जात असल्याचे समोर आले आहे. मुंबईमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या एका रेस्टॉरंट अँड बारवर (Restaurant & Bar) मुंबई पालिकेनं (mumbai municipal corporation) थेट कारवाई केली आहे. तब्बल 245 लोकं विना मास्क (Mask) असल्याचे आढळून आले असून दंड वसूल करण्यात आला आहे. मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करा, असं वारंवार मुंबई पालिकेकडून सांगितले जात आहे. पण, मुंबईकरांकडून कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे.  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डी विभाग कार्यालयातर्फे बुधवारी रात्री  एकच्या सुमारास ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळील अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार सुरू असल्याचे समोर आले. या हॉटेलवर महापालिकेच्या पथकाने धाड टाकून 245 लोकांवरती विना मास्क विषयक कारवाईसह सामाजिक अंतर न राखणे आणि शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई केली आहे. तसंच या लोकांविरोधात एफआयआर सुद्धा दाखल करण्यात आला आहे. On This Day : कार्तिकचा शेवटच्या बॉलवर सिक्स आणि टीम इंडियाला विजेतेपद! रात्री 1 वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.  तसंच 245 लोकांवरती विना मास्क आढळल्यामुळे 19 हजार 400 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या हे 'रेस्टॉरन्ट आणि बार' महापालिकेने बंद केले आहे. फेसबुक, गुगल कंपन्यांनी माध्यमांना पत्रकारितेसाठी शुल्क देणारा कायदा करावा' काही दिवसांपूर्वी  'अजूनही परिस्थिती नियंत्रणात असून हॉटेल व उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक लॉकडाऊन (Lockdown) करण्यास भाग पडू नये. हा शेवटचा इशारा आहे', मुख्यमंंत्र्यांनी दिला होता. एवढंच नाहीतर नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन, शॉपिंग सेन्टर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींशी शनिवारी मुख्यमंत्र्यांनी (CM Uddhav Thackarey) दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन संवाद साधला आणि सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं. पण, त्यानंतर मुंबईतील काही भागांमध्ये पब्ज, बार आणि रेस्टॉरंट रात्री उशिरापर्यंत सुरूच असल्याचे समोर आले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BMC, Rules, Social distancing, मुंबई महापालिका

    पुढील बातम्या