• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • VIDEO: मनसेला बिग बींच्या उत्तराची 'प्रतिक्षा'; घराबाहेर बॅनर लावत केली मोठं मन दाखवण्याची मागणी

VIDEO: मनसेला बिग बींच्या उत्तराची 'प्रतिक्षा'; घराबाहेर बॅनर लावत केली मोठं मन दाखवण्याची मागणी

रस्त्याच्या रुंदीकरणासाठी बिग बींच्या बंगल्याची भिंत पाडण्यात येणार (Pratiksha Bunglow Wall Will Be Demolished By Bmc) आहे. यासंदर्भात 2017 साली अमिताभ यांना नोटीसही बजावण्यात आली आहे.

 • Share this:
  मुंबई 15 जुलै : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) बंगल्यावर मुंबई महानगर पालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे. अमिताभ यांच्या 'प्रतीक्षा' बंगल्यावर ही कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी बिग बींच्या बंगल्याची भिंत पाडण्यात येणार (Pratiksha Bungalow Wall Will Be Demolished By Bmc) आहे. यासंदर्भात 2017 साली अमिताभ यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. अशात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) बुधवारी रात्री बिग बींच्या जुहू (Juhu) येथील प्रतीक्षा बंगल्याबाहेर एक बॅनर लावला आहे. या बॅनरवर लिहिलं आहे, की Big b show Big heart "प्रतीक्षा" संत ज्ञानेश्वर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी (Widen the Road) बीएमसी आणि लोकांची मदत करा. मोठी बातमी, करीना कपूरविरोधात बीडमध्ये पोलिसांत तक्रार दाखल काय आहे संपूर्ण प्रकरण : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या घराची एक भिंत तोडण्याची तयारी सुरू आहे. मुंबई महानगरपालिका बच्चन यांच्या जुहूमधील प्रतीक्षा या बंगल्याची एका बाजूची भिंत पाडण्याची तयारी करत आहे. यासाठी 2017 सालीच बीएमसीनं अमिताभ बच्चन यांना नोटीस पाठवली होती. मात्र, बॉलिवूड महानायकानं आतापर्यंत या नोटीसला उत्तर दिलेलं नाही. 'देवमाणूस' मंगल, वंदीआत्यासह लेडी गॅंगचा धमाकेदार डान्स; VIDEO होतोय VIRAL बीएमसीला अभिनेत्याच्या घराची एक भिंत पाडून हा रस्ता 60 फूट रुंद करायचा आहे. कारण सध्या हा रोड केवळ 45 फूट रुंद आहे. अमिताभ यांच्या घरासमोर दररोज वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतं. याच कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. अमिताभ यांनी बीएमसीकडून नोटीस मिळाल्यानंतर न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानं यावर आपला निर्णय देत हे काम थांबवण्यास सांगितलं होतं. मात्र, मागील वर्षी न्यायालयानं काम पुन्हा एकदा सुरू करण्याचं म्हटलं होतं.
  Published by:Kiran Pharate
  First published: