मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'Devmanus' मंगल, वंदीआत्यासह लेडी गॅंगचा धमाकेदार डान्स; VIDEO होतोय VIRAL

'Devmanus' मंगल, वंदीआत्यासह लेडी गॅंगचा धमाकेदार डान्स; VIDEO होतोय VIRAL

व्हिडिओत मालिकेतील लेडी गँग पाहायला मिळत आहे. मालिकेतील साधी भोळी मंगल, आगाऊ वंदी आत्या, कर्तव्य दक्ष एसीपी दिव्या सिंग आणि वकील आर्या देशमुख. या सगळ्याजणी भन्नाट डान्स करताना दिसत आहेत.

  • Published by:  News Digital

मुंबई 14 जुलै: झी मराठी (Zee Marathi) वरील ‘देवमाणूस’ (Devmanus) मालिका नेहमीच चर्चेत असते. तितकीच त्या मालिकेच्या सेटवर वर धम्माल ही पाहायला मिळते. सेटवरील कलाकार मंडळी नेहमी मोकळ्या वेळात एकमेकांसोबत मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडिओत मालिकेतील लेडी गँग पाहायला मिळत आहे. मालिकेतील साधी भोळी मंगल, आगाऊ वंदी आत्या, कर्तव्य दक्ष एसीपी दिव्या सिंग आणि वकील आर्या देशमुख. या सगळ्याजणी भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. (Devmanus offset videos)

अरे देवा! सोनू सूदला चित्रपटात मार खाताना पाहून भडकलेल्या चिमुकल्याने फोडला TV

‘एक बार तुझको देखा तो सनम’ या जुन्या सुपरहिट गाण्यावर त्या नृत्य करत आहेत. तर त्यांना अनेक मजेशीर कमेंट्स ही मिळत आहेत. या गँग मध्ये अनेकांनी सरू आजीला मिस केलं.

तर काहींनी देवी सिंगला (Devi singh) पकडण्याची मागणी केली. दरम्यान मालिकेत सध्या देवी सिंग कोर्टातून स्वतःची सुटका करून घेत आहे. तर पुराव्याअभावी कोर्टाला त्याच्या बाजूने निकाल द्यावा लागत आहे. त्यामुळे प्रेक्षकांचीही उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

मालिकेतील सगळेच कलाकार नेहमीच सेटवर मजामस्ती करताना दिसतात. दिव्या म्हणजेच अभिनेत्री नेहा खान (Neha Khan) नेहमी मजेशीर व्हिडिओ शेअर करते. याशिवाय डिम्पल (Dimple) म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुख (Asmeeta Deshmukh) ही असेच व्हिडिओ शेअर करत असते.

First published:

Tags: Marathi entertainment, Zee marathi serial