जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / BMC Election: मुंबईसह 14 महानगरपालिकांसाठी आज आरक्षण सोडत, इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली

BMC Election: मुंबईसह 14 महानगरपालिकांसाठी आज आरक्षण सोडत, इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली

BMC Election: मुंबईसह 14 महानगरपालिकांसाठी आज आरक्षण सोडत, इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली

BMC election updates: नव्या वॉर्ड रचनेनुसार आणि वाढलेल्या वॉर्डासह आज मुंबई महापालिकेच्या 236 वॉर्डाचे ओबीसी आरक्षणाशिवाय आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 मे : देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहराच्या महापालिका निवडणुकीचे (BMC Election 2022) बिगुल आज खऱ्या अर्थाने वाजणार आहे. नव्या वॉर्ड रचनेनुसार आणि वाढलेल्या वाँर्डासह आज मुंबई महापालिकेच्या 236 वॉर्डाचे ओबीसी आरक्षणाशिवाय आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. मुंबईसह राज्यातील एकूण 14 महानगरपालिकांच्या प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. मुंबईतील रंगशारदा सभागृहात राज्य निवडणूक आयोग (Maharashtra State Election Commission) मुंबई महापालिकेच्या 236 वॉर्डांची कशी आरक्षण सोडत काढणार आहे. कुठल्या मनपांची आरक्षण सोडत ? मुंबई ठाणे पुणे पिंपरी-चिंचवड नाशिक नागपूर कल्याण - डोंबिवली नवी मुंबई वसई-विरार उल्हासनगर कोल्हापूर सोलापूर अकोला अमरावती महापालिकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम 27 मे ते 13 जूनपर्यंत सुरू राहणार आहेत. नवी मुंबई, वसई विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला व नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. तसंच, राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांच्या अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, जोपर्यंत राज्य शासन त्रिस्तरीय चाचणी पूर्ण करीत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता जागा राखून ठेवता येणार नाहीत, असंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. वाचा :  भाजपचं ठरलं! राज्यसभेची तिसरी जागा लढवणार, धनंजय महाडिकांना उमेदवारी जाहीर मुंबई महापालिका निवडणुक आरक्षण सोडत मुंबई महापालिकेचे आता एकुण 236 वॉर्ड आहेत त्यापैकी 50% म्हणजेच 118 वॉर्ड हे महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. 236 वॉर्डपैकी अनुसूचित जातींसाठी 15 वॉर्ड आरक्षित. त्यापैकी 8 वॉर्ड महिला अनुसूचित जातींसाठी आरक्षित असणार आहेत. 236 वॉर्डपैकी 2 वाॉर्ड अनुसूचित जमातींसाठी असणार आहेत. त्यापैकी 1 वॉर्ड महिला अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असणार आहे. 236 वॉर्ड पैकी 219 वॉर्ड खुल्या वर्गासाठी असणार आहेत. त्यापैकी 109 वॉर्ड खुल्या वर्गातील महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. आज होणाऱ्या आरक्षण सोडतीवर 1 ते 6 जूनपर्यंत हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर 13 जून रोजी अंतिम आरक्षण सोडत अधिकृतपणे राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे. आरक्षण सोडत निघाल्यानंतर निवडणुक पूर्व तयारीसाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीची घोषणा सप्टेंबर महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर 45 दिवसांची आदर्श आचारसंहिता लागू होईल. या सर्व निवडणूक प्रक्रियेनंतर मुंबई महापालिकेसाठी ऑक्टोबर महिन्यात मतदान होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. नागपूर महानगरपालिका आरक्षण सोडत आज नागपूर महानगरपालिकेची त्रिस्तरीय प्रभाग पद्धतीनुसार लोकसंख्येच्या आधारावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची आरक्षण सोडत निघणार आहे. लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार अनुसूचित जातीच्या 31 व अनुसूचित जमातीच्या 12 जागेसाठी ही सोडत असणार आहे. नागपूर महानगरपालिकेत 52 प्रभाग असून त्यासाठी 156 नगरसेवक असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BMC , election , mumbai
  • First Published :
जाहिरात
जाहिरात