जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / भाजपचं ठरलं! राज्यसभेची तिसरी जागा लढवणार, धनंजय महाडिकांना उमेदवारी जाहीर

भाजपचं ठरलं! राज्यसभेची तिसरी जागा लढवणार, धनंजय महाडिकांना उमेदवारी जाहीर

कोल्हापूरमधून धनंजय महाडिक (dhananjay mahadik) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

कोल्हापूरमधून धनंजय महाडिक (dhananjay mahadik) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

कोल्हापूरमधून धनंजय महाडिक (dhananjay mahadik) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 मे : राज्यसभा निवडणुकीसाठी ( rajya sabha election 2022) भाजपकडून अखेर उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून माजी रेल्वे मंत्री पियूष गोयल ( Piyush Goyal) आणि डॉ. अनिल बोंडे (anil bonde) यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच, भाजपकडे तिसऱ्या जागेसाठीही उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. कोल्हापूरमधून धनंजय महाडिक (dhananjay mahadik) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी आता चुरस आणखी वाढली आहे. शिवसेना, काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर भाजपकडून आज दोन यादी जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिल्या यादीत भाजपकडून पियूष गोयल आणि अनिल बोंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर तिसऱ्या जाागेचा सस्पेन्स कायम होता. अखेरीस तिसरी जागा लढवणार असल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यातआले आहे. तिसऱ्या जागेसाठी कोल्हापूरमधून धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिसऱ्या जागेसाठी विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या नावाची चर्चा रंगली होती. पण कोल्हापूरमध्ये शिवसेनेला शह देण्यासाठी धनंजय महाडिक मैदानात उतरले आहे. तिसऱ्या जागेसाठी उद्या धनंजय महाडिकही उमेदवारी अर्ज भरणार आहे. धनंजय महाडिक हे मुंबईत थांबलेले आहे. आता उद्या ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. ( पनवेलमध्ये भरदिवसा दरोडो, TUV 300 गाडीच्या चालकावर प्राणघातक हल्ला, आणि… ) कोल्हापूरमध्ये शिवसेनेनं जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना उमेदवारी देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तर भाजपकडून आता धनंजय महाडिक यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत. राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज आहे. भाजपला फक्त 13 मतांची गरज आहे. काय आहे संख्याबळ? सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत. ( पावसाळ्यात व्हायरल, सर्दी, फ्लू सारखे आजार होतात? आहारात या गोष्टींचा समावेश करा ) राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपनं लढवल्यास फोडाफोडी करावी लागू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात