मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /अधिवेशनात नवा ड्रामा, विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपने भरवली अभिरुप विधानसभा

अधिवेशनात नवा ड्रामा, विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपने भरवली अभिरुप विधानसभा

 विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे सर्व आमदारांनी पायऱ्यांवरच सभा भरवली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे सर्व आमदारांनी पायऱ्यांवरच सभा भरवली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे सर्व आमदारांनी पायऱ्यांवरच सभा भरवली आहे.

मुंबई, 06 जुलै: पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) पहिल्या दिवशी 12 आमदार (BJP MLA) वर्षभरासाठी निलंबित झाल्यामुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. आज दुसऱ्या दिवशी  अधिवेशनाला सुरुवात झाली असता भाजपच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर अभिरुप विधानसभा (Assembly) भरवली आहे.

भाजपच्या आमदारांनी आज सभागृहात न जाता विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे सर्व आमदारांनी पायऱ्यांवरच सभा भरवली आहे. कालीदास कोळमकर यांना या विधानसभेचं अध्यक्ष करण्यात आले आहे.  भाजपचे आमदार एकेएक करून महाविकास आघाडी सरकारविरोधात मत मांडत आहे. देवेंद्र फडणवीस सुद्धा बोलणार आहे. तर दुसरीकडे विधानसभेचं कामकाज सुरू झाले आहे.

परमबीर सिंगांच्या अडचणीत वाढ, विधानसभा उपसभापतींनीही दिले नाशिक पोलिसांना आदेश

दरम्यान, सत्ताधारी पक्ष आज विधिमंडळामध्ये केंद्र सरकारने महिन्याला तीन कोटी लस उपलब्ध करून द्याव्या असा ठराव आणणार आहेत. यावरून परत एकदा राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष दिसण्याची शक्यता आहे. विधानसभेत आमदार निलंबित केल्यानंतर भाजप अधिक आक्रमक झालं आहे. आज महाविकास आघाडी सरकारमधील काही भ्रष्टाचाराची प्रकरणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस विधानसभेत मांडतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील काही प्रमुख मंत्र्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप होण्याची शक्यता असल्याचं समजतं.

घरबसल्या सरकारच्या मदतीनं सुरू करा हा व्यवसाय; कमी गुंतवणूकीत कमवाल बक्कळ पैसा

काँग्रेस पक्ष विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या मागणीस आग्रही आहे. तसंच केंद्रातील कृषी कायद्याच्या विरोधातील ठरावाबाबत आज सभागृहात काही घडामोडी घडण्याची शक्यता आहे. वास्तविक जर कृषी कायद्याच्याबाबत काँग्रेसचा केंद्र सरकारविरोधातील ठराव मंजूर झाला नाही तर मात्र पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही मित्र पक्षांनी काँग्रेस पक्षाच्या मागणीला केराची टोपली दाखवली, असंही म्हटलं जाईल.

First published:
top videos

    Tags: Assembly session, BJP, Maharashtra, Mla, Monsoon, Mumbai, Session