नवी दिल्ली 06 जुलै: व्यवसाय करणं ही सहज सोपी गोष्ट नाही. पण जर तुम्ही तुमच्या मनाचे राजे असाल आणि खूप पैसे कमवण्याची इच्छा असेल तर तुम्ही उद्योजक किंवा व्यावसायिक होऊ शकता. एवढंच नाही बरं का, तर तुमच्यात पाहिजे चिकाटी आणि कोणत्याही आव्हानाला तोंड देण्याची तयारी. जर हे गुण तुमच्याकडे असतील आणि जर तुम्ही नवा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर आम्ही आज तुम्हाला एक व्यवसाय (Business opportunity) सुचवणार आहोत. या व्यवसायातील उत्पादनाला घरोघरी प्रचंड मागणी आहे त्यामुळे तुम्ही प्रचंड कमाई करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याजवळ हवेत 1.14 लाख रुपये. जरी तुमच्याकडे रोख रक्कम नसेल तरीही काळजी करू नका. तुम्हाला केंद्र सरकार (Central Government) मदत करू शकतं. तर जाणून घेऊया तुम्हाला बंपर कमाई करून देणारा हा व्यवसाय कुठला आहे.
कुठला आहे हा व्यवसाय?
सध्या घरोघरी कटलरीचा चमचे, नाइफ, काटा याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तसंच हॉटेल्समध्येही कटलरी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. त्यामुळे या वस्तूंना मोठी मागणी आहे. त्यामुळे तुम्ही कटलरीचा व्यवसाय सुरू करा आणि भरपूर कमाई करा. यात तुम्ही हँड टूल आणि शेतीची अवजारंही तयार करू शकता. त्याचबरोबर तुम्ही मोठ्या प्रमाणात उत्पादन करून परदेशात या वस्तूंची निर्यातही करू शकता. घरगुती वस्तुंबरोबरच शेतीची टूल असल्याने परदेशातही मागणी मोठी असेल.
1 ऑगस्टपासून बदलणार या मोठ्या खाजगी बँकेचे नियम, तुमचं खातं असल्यास जाणून घ्या
दरमहा होईल किती कमाई?
या व्यवसायाच्या सेटअपसाठी तुम्हाला 1.8 लाख रुपये खर्च करावे लागतील. त्यासाठी तुम्हाला वेल्डिंग सेट, बफिंग मोटर, ड्रिलिंग मशीन, बेंच ग्राइंडर, हँड ड्रिलिंग, बेंच, पॅनेल बोर्ड आणि अन्य यंत्र विकत घ्यावी लागतील. या वस्तू तयार करण्यासाठी तुम्हाला कच्चा माल खरेदी करण्यासाठी अंदाजे 1.2 लाख रुपये खर्चावे लागतील. तुमचे कामगार आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी तुम्हाला दरमहा 30 हजार रुपये खर्च येईल.
केंद्र सरकार करतंय मदत
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी येणाऱ्या एकूण खर्चापैकी फक्त 1.4 लाख रुपये तुम्हाला खर्च करायचे आहेत. बाकीचा खर्च भागवण्यासाठी तुम्हाला केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घेता येईल. व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांना हे कर्ज सरकार देतं.
तुम्ही एखादं App अशाप्रकारे डाउनलोड करत असाल तर सावधान, SBI ने दिला इशारा
बँकेत करा कर्जासाठी अर्ज
पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत नवउद्योजकांना कर्ज दिलं जातं. तुम्हाला कटलरीचा व्यवसाय करायचा असेल किंवा अन्य कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकता. कोणत्याही सरकारी बँकेत जायचं आणि पंतप्रधान मुद्रा योजनेतील कर्जासाठी अर्ज भरायचा. या अर्जामध्ये तुम्हाला नाव, पत्ता, व्यवसायाच्या ठिकाणाचा पत्ता, शिक्षण, सध्याची कमाई आणि किती कर्ज हवं आहे ही माहिती भरावी लागले. तसंच काही कागदपत्रंही तुम्हाला अर्जासोबत जोडावी लागतील. तुम्ही तो अर्ज दिल्यानंतर बँकेचे अधिकारी तुमच्या अर्जाची पडताळणी करून तुम्हाला कर्ज देण्याबाबतचा निर्णय घेतील. कर्ज मिळालं की तुमचा व्यवसाय सुरू आणि बक्कळ कमाईही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Business News, Investment, Money, Start business