Home /News /mumbai /

बाळासाहेब सानप यांच्या घरवापसीनंतर भाजपमध्ये उभी फूट, शेकडो कार्यकर्ते नाराज

बाळासाहेब सानप यांच्या घरवापसीनंतर भाजपमध्ये उभी फूट, शेकडो कार्यकर्ते नाराज

नाशिक, धुळे जिल्ह्यातील शेकडो भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले आहेत. विशेष म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या उपस्थितीत भाजपचे शेकडो पदाधिकारी आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

  मुंबई, 22 डिसेंबर: नाशिकचे शिवसेनेचे (Nashik Shiv Sena) माजी आमदार बाळासाहेब सानप (balasaheb Sanap) यांनी मनगटावरील 'शिवबंधन' तोडून भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांच्या घरवापसीमुळे नाशिक, धुळे जिल्ह्यातील शेकडो भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले आहेत. विशेष म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या उपस्थितीत भाजपचे शेकडो पदाधिकारी आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुंबईतील शिवसेना भवनात आज दुपारी तीन वाजता भाजप पदाधिकाऱ्याचा शिवसेना प्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हेही वाचा...शाहरुखसोबत स्क्रीन शेअर केलेल्या अभिनेत्रीची अर्धांगवायू, स्ट्रोकशी झुंज बाळासाहेब सानप यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेना आणखी आक्रमक झाली आहे. बाळासाहेब सानप यांनी दोनच वर्षात पुन्हा पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं समजतं. बाळासाहेब सानप हे नाशिक पालिकेत महापौर राहिले आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत विधानसभा लढवली होती. त्यानंतर सानप यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. 2019 ची निवडणूक सानप यांनी लढवली. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभेत पराभव झाल्यामुळे सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता शिवसेनेला रामराम ठोकून सानप पुन्हा भाजपमध्ये दाखल झाले आहे. दुसरीकडे मात्र, सानप यांच्या घरवापसीमुळे नाशिक, धुळे जिल्ह्यातील शेकडो भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. संजय राऊत यांच्या उपस्थितीत ते आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. देवेंद्र फडणवीसांनी दिले मेगाभरतीचं संकेत... राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आता महाविकास आघाडीतील अनेक नेते आणि आमदार संपर्कात असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, असा खळबळजनक दावा केला आहे. 'नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. त्यामुळे तिथून भविष्यात आपला खासदार तिथून निवडून येणार आहे. पुढील काही काळात अनेक आमदार आणि नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. पण काही लोकं उगाच वावड्या उठवत असतात की, भाजपचे नेते आमच्याकडे येणार आहे. पण, मुळात त्यांच्या पक्षामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आमदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी ते अशा पुंग्या सोडत असतात. पण, त्यात काहीही तथ्य नाही. आमचे सर्व आमदार एकाच ठिकाणी आहे' असा दावा फडणवीस यांनी केला आहे. हेही वाचा...शिवसेनेला धक्का, शिवबंधन तोडून बाळासाहेब सानप भाजपमध्ये दाखल 'भाजपमध्ये जे बाहेरून नेते आले आहे, त्यांनी मोठं राजकारण पाहिले आहे. त्यांना चांगले समजते की, या देशाचे भवितव्य हे राहुल गांधी नाही, सोनिया गांधी नाही आणि यूपीए सरकार सुद्धा नाही. देशाचे भवितव्य फक्त नरेंद्र मोदी हेच आहे' असंही फडणवीस यांनी सांगितलं आहे.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Sandip Parolekar
  First published:

  Tags: Sanjay raut, शिवसेना

  पुढील बातम्या