जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / शाहरुखसोबत स्क्रीन शेअर केलेल्या अभिनेत्रीची अर्धांगवायूशी झुंज; स्वत:च्या पायावर उभं राहणं...

शाहरुखसोबत स्क्रीन शेअर केलेल्या अभिनेत्रीची अर्धांगवायूशी झुंज; स्वत:च्या पायावर उभं राहणं...

शाहरुखसोबत स्क्रीन शेअर केलेल्या अभिनेत्रीची अर्धांगवायूशी झुंज; स्वत:च्या पायावर उभं राहणं...

शिखा मल्होत्राची (Shikha Malhotra) तब्येत अतिशय नाजूक आहे. ती पुन्हा स्वत:च्या पायावर उभी राहू शकेल की नाही याबद्दल डॉक्टरांनाही खात्री नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 डिसेंबर: अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) बरोबर फॅन (Fan) सिनेमात काम करणारी अभिनेत्री शिखा मल्होत्रा (Shikha Malhotra) काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. कोरोनाला तिने हरवलंच होतं, तोपर्यंत आणखी एक धक्कादायक घटली. अभिनेत्रीने कोरोनाला हरवल्यानंतर तिला अर्धांगवायू आणि ब्रेन स्ट्रोक झाला. या आजारातून शिखा मल्होत्रा बरी होत आहे पण तिची रिकव्हरी अतिशय संथपणे चालू आहे. स्वत:च्या पायावर उभं राहता येण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. शिखा एक सर्टिफाइड नर्स आहे. अभिनय क्षेत्राबरोबरच तिने रुग्णसेवेचाही वसा घेतला आहे. मुंबईच्या जोगेश्वरीमधील हिंदू हृदयसम्राट ट्रॉमा सेंटरमध्ये ती नर्स म्हणून कोरोना रुग्णांची सेवा करत होती. सहा महिने तिने ही सेवा केली. त्यावेळीच तिला कोरोनाची लागण झाली होती.

जाहिरात

शिखाने काही प्रसिद्ध सिनेमात काम केले आहे. फॅन (Fan) या सिनेमात तिने शाहरुखबरोबरही (Shahrukh Khan) स्क्रीन शेअर केली आहे. संजय मिश्रा यांच्या 2019 साली आलेल्या ‘कांचली’ या सिनेमात देखील तिने महत्त्वाचे काम  केले होते. तर तापसी पन्नू बरोबर तिने ‘रनिंग शादी डॉट कॉम’ मध्ये काम केलं आहे. शिखा ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची शिकार झाली होती. 22 ऑक्टोबरला तिला डिस्चार्ज मिळाला होता. काही महिन्यातच पुन्हा एकदा अशी धक्कादायक घटना घडली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात