Home /News /mumbai /

शिवसेनेला धक्का, शिवबंधन तोडून बाळासाहेब सानप भाजपमध्ये दाखल

शिवसेनेला धक्का, शिवबंधन तोडून बाळासाहेब सानप भाजपमध्ये दाखल

बाळासाहेब सानप यांनी पक्ष बदलण्यात आता चौकार लगावला आहे. गेल्या दोन वर्षात सानप यांनी 3 पक्ष बदलले आहे. आता पुन्हा एकदा ते भाजपमध्ये प्रवेश दाखल झाले आहे.

    मुंबई, 21 डिसेंबर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शिवबंधन तोडून अखेर माजी आमदार बाळासाहेब सानप(Balasaheb Sanap)  यांची भाजपमध्ये घरवापसी झाली आहे. मुंबईत भाजपचे विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील नरिमन पाँईट येथील भाजपच्या मुख्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सानप हे आधीपासूनच भाजपमध्ये होते. ते फक्त आपल्यापासून काही काळ दूर गेले होते. पण, आता ते परत आले आहे.  बाळासाहेब कुठल्याही जबाबदारी पेलू शकतात.  त्यांना योग्य जबाबदारी दिली जाईल. सानप यांच्या येण्यामुळे पक्ष मजबूत होईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसंच, 'भाजपात आणखी काही जणांचा प्रवेश होणार आहे. काही चांगल्या लोकांना पक्षात घेणार असून योग्य ती जबाबदारी देण्यात येणार आहे.  महा विकासआघाडीचे अनेक आमदार नाराज, त्यांनाच भाजपात यायचं आहे. तीन पक्षांनी एकत्र यावेत, यामुळे राजकारणात मोठी जागा मोकळी होईल. ती आम्ही काबीज करू' असंही फडणवीस म्हणाले. विशेष म्हणजे, बाळासाहेब सानप यांनी पक्ष बदलण्यात आता चौकार लगावला आहे. गेल्या दोन वर्षात सानप यांनी 3 पक्ष बदलले आहे. आता पुन्हा एकदा ते भाजपमध्ये प्रवेश दाखल झाले आहे. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये सानप यांचा फायदा होईल, असं सांगत सानप यांच्या भाजप प्रवेशाला वरिष्ठ नेत्यांनीच हिरवा कंदील दिला आहे. सानप हे नाशिक पालिकेत महापौर राहिले होते. भाजपकडून त्यांनी महापौरपद पटकावले होते. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत विधानसभा लढवली होती. त्यानंतर सानप यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.  2019 ची निवडणूक सानप यांनी लढवली होती, पण पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभेत पराभव झाल्यामुळे सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता शिवसेनेला रामराम ठोकून सानप पुन्हा भाजपमध्ये दाखल झाले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या