देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होत असताना खडसेंची दांडी

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होत असताना खडसेंची दांडी

त्यामुळे खडसे विधिमंडळातल्या सक्रिय राजकारणातून दूर गेलेत. गेली चारवर्ष एकनाथ खडसे हे पक्षात नाराज होते. वेळो वेळी त्यांनी ती नाराजी बोलूनही दाखवली होती.

  • Share this:

मुंबई 30 ऑक्टोंबर : देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आणि सत्तास्थापनेच्या दृष्टीने भाजपने एक पाऊल पुढे टाकले. विधानभवनात उत्साहात झालेल्या या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि इतर 10 आमदारांनी त्याला अनुमोदन दिलं. भाजपचे मित्रपक्ष असलेल्या काही नेत्यांनीही फडणवीसांच्या नावाला अनुमोदन दिलं. या कार्यक्रमात नवनिर्वाचित आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. मात्र एका नेत्याची उपस्थिती सगळ्यांनाच खटकली. ते नेते होते एकनाथ खडसे.  पराभूत झाल्यानंतरही पंकजा मुंडे या बैठकीला आवर्जुन उपस्थित होत्या. ज्यांना तिकीट दिलं नाही ते विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळेही या बैठकीला उपस्थित होते. या नेत्यांच्या चेहेऱ्यावर नेहमीचा उत्साह दिसून येत नव्हता.

मात्र त्यांची उपस्थिती सगळ्यांना जाणवत होती. एकनाथ खडसे हे गेली चार दशकं भाजपमध्ये सक्रिय आहेत. अनेक वर्ष त्यांनी विधिमंडळात गाजवली आहेत. विरोधपक्षनेते म्हणूनही त्यांनी दिर्घकाळ काम केलं. त्यामुळे त्यांची अनुउपस्थिती अनेकांना खटली. या विधानसभा निवडणुकीत खडसे यांना भाजपने उमेदवारी नाकारत त्यांच्या मुलीला तिकीट दिलं होतं. मात्र निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यामुळे खडसे विधिमंडळातल्या सक्रिय राजकारणातून दूर गेलेत. गेली चारवर्ष एकनाथ खडसे हे पक्षात नाराज होते. वेळो वेळी त्यांनी ती नाराजी बोलूनही दाखवली होती.

पुण्यात 'चंपा'साडी सेंटरचं उद्घाटन

मुख्यमंत्री काय म्हणाले उद्धव ठाकरेंबद्दल?

भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्याला किनार होती ती भाजप आणि शिवसेनेच्या सत्ता वाटपाच्या संघर्षाची. त्यामुळे फडणवीस कुठले संकेत देतात याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे.पी. नड्डा यांचे आभार मानले. त्याच बरोबर त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही आभार मानले. ते म्हणाले, महायुती म्हणून निवडणूक लढलो. यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मोलाचं सहकार्य मिळालं त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.

नेतेपदी निवड झाल्यानंतरच्या भाषणात उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री

शंकेचं कुठलंही कारण नाही. ज्यांना शंका घ्याची आहे ते चर्चा करत आहेत. आपण महायुती म्हणून मतं मागितली, लोकांना समोरे गेलो, लोकांनी बहुमताने निवडणून दिलं आणि आता महायुतीचच सरकार येणार आहे यात कुणालाही शंका घेण्याचं कारण नाही.

शंकेचं कारण नाही, महायुतीचंच सरकार येणार - मुख्यमंत्री

ते पुढे म्हणाले, गेल्या पाच वर्षात सरकारने उत्तम काम केलं. मात्र सर्वच आम्ही केलं आणि ते झालं असा दावा आमचा नाही. राहिलेली काम पुढच्या पाच वर्षात पूर्ण करणार आहोत. सर्व जाती, धर्म आणि पंथांच्या लोकांनी भाजपला मतदान केलं आहे. सर्वच वगाचं प्रतिनिधित्व भाजपमध्ये आहे त्यामुळे भाजप हा सर्व सामान्यांचा पक्ष ठरलाय असंही ते म्हणाले. गेली पाच वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक म्हणून काम केलं आणि आता पुढील पाच वर्षही महाराजांचे सेवक म्हणून काम करणार असंही ते म्हणाले. विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी मांडला आणि विविध पक्षांच्या 10 आमदारांनी त्याला अनुमोदन दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2019 06:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading