पुण्यात 'चंपा'साडी सेंटरचं उद्घाटन

आम्हाला हवी विकासाची गाडी, नको चंपा साडी अशा घोषणांनी राष्ट्रवादीने पाटलांना लक्ष केलं.

News18 Lokmat | Updated On: Oct 30, 2019 06:32 PM IST

पुण्यात 'चंपा'साडी सेंटरचं उद्घाटन

वैभव सोनवणे, पुणे 30 ऑक्टोंबर : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आज चंपा साडी सेंटरचं उद्घाटन केलं. खंडोजी बाबा चौकातील हे दुकान पुणेकरांचं लक्ष वेधून घेतंय. कोथरूडचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मतदार संघात महिलांना केलेल्या साडी वाटपाचा राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करण्यात आला. चंद्रकांत पाटील आणि साडीचा वाद काही केल्या थांबायला तयार नाही. चंद्रकांत पाटील यांनी जरी साडी वाटपाच समर्थन केलं तरी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केलीय. आम्हाला हवी विकासाची गाडी, नको चंपा साडी अशा घोषणांनी राष्ट्रवादीने पाटलांना लक्ष केलं. निवडणुकीनंतर जर या साड्या वाटण्यात आल्या असतील तर निवडणुकीत मतदारांना किती प्रलोभन दाखवली गेली असतील असा प्रश्न राष्ट्रवादीने उपस्थित केलाय.  कोल्हापूरकर सुधारणार नाहीत म्हणणारे स्वतः सुधारले नाहीत. त्यामुळे असे लोक कोथरूडमधील महिलांना साड्या वाटतात. त्यातही अनेक साड्या डिफॉल्ट आहेत. असा आरोप राष्ट्रवादीचे हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी केलाय.

नेतेपदी निवड झाल्यानंतरच्या भाषणात उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री

राष्ट्रवादीच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर देत चंद्रकांत पाटलांचे प्रचार प्रमुख मुरली मोहोळ यांनी उलट राष्ट्रवादीवरच घाणेरडं राजकारण करत असल्याचा आरोप केलाय. विरोधक खराब साड्याही पाकीटात घालून खोटी टीका करायला कमी करणार नाहीत इतक्या पातळींवर पराभवाचा धक्का त्यांना लागलाय अश्या शब्दात मनसे आणि राष्ट्रवादीला त्यांनी फटकारलंय.

शंकेचं कारण नाही, महायुतीचंच सरकार येणार - मुख्यमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांसोबत दिवाळी साजरी करा असं आवाहन केलं होतं. त्या आहवानानुसारच हे साड्यापाटप केलं जात आहे. भाऊबीजेची ही भेट असून त्यात राजकारण करू नये असंही पाटील यांनी म्हटलंय. कोथरूड या मतदारसंघात चंद्रकांत पाटील हे तब्बल 1 लाख साड्या वाटणार आहेत. ही माहिती बाहेर आल्यानंतर जोरदार राजकारण सुरू झालं. पाटील यांची निवडही रद्द करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2019 05:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...