नेतेपदी निवड झाल्यानंतर पहिल्याच भाषणात उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री?

सत्तावाटपावरून भाजप आणि शिवसेनेच संघर्ष सुरू असल्याने देवेंद्र फडणवीस काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Oct 30, 2019 04:43 PM IST

नेतेपदी निवड झाल्यानंतर पहिल्याच भाषणात उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुंबई 30 ऑक्टोंबर : भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्याला किनार होती ती भाजप आणि शिवसेनेच्या सत्ता वाटपाच्या संघर्षाची. त्यामुळे फडणवीस कुठले संकेत देतात याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे.पी. नड्डा यांचे आभार मानले. त्याच बरोबर त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही आभार मानले. ते म्हणाले, महायुती म्हणून निवडणूक लढलो. यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मोलाचं सहकार्य मिळालं त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.

शंकेचं कुठलंही कारण नाही. ज्यांना शंका घ्याची आहे ते चर्चा करत आहेत. आपण महायुती म्हणून मतं मागितली, लोकांना समोरे गेलो, लोकांनी बहुमताने निवडणून दिलं आणि आता महायुतीचच सरकार येणार आहे यात कुणालाही शंका घेण्याचं कारण नाही.

शंकेचं कारण नाही, महायुतीचंच सरकार येणार - मुख्यमंत्री

ते पुढे म्हणाले, गेल्या पाच वर्षात सरकारने उत्तम काम केलं. मात्र सर्वच आम्ही केलं आणि ते झालं असा दावा आमचा नाही. राहिलेली काम पुढच्या पाच वर्षात पूर्ण करणार आहोत. सर्व जाती, धर्म आणि पंथांच्या लोकांनी भाजपला मतदान केलं आहे. सर्वच वगाचं प्रतिनिधित्व भाजपमध्ये आहे त्यामुळे भाजप हा सर्व सामान्यांचा पक्ष ठरलाय असंही ते म्हणाले. गेली पाच वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक म्हणून काम केलं आणि आता पुढील पाच वर्षही महाराजांचे सेवक म्हणून काम करणार असंही ते म्हणाले. विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी मांडला आणि विविध पक्षांच्या 10 आमदारांनी त्याला अनुमोदन दिलं.

जोरदार शक्तिप्रदर्शन करत भाजपने निवडला आपला विधिमंडळ नेता, मातोश्रीवर खलबते

Loading...

काय म्हणाले चंद्रकांत पाटील...

वसंतराव नाईक यांची टर्म 11 वर्षांची होती, त्यांचा रेकॉर्ड आम्ही तोडणार आहोत, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. आज सर्वजण खूप आनंदात आहोत. राज्यात बिगर काँग्रेस सरकार पुन्हा आले. पाच वर्षे सलग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टर्म पूर्ण केली. स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा 11 वर्षाचा मुख्यमंत्रिपदाचा रेकॉर्ड देवेंद्र फडणवीस तोडतील. राज्यात सर्वाधिक जागा मिळलेला आपला पक्ष आहे. वयाचा आणि अनुभवाचा आदर आमच्याही मनात आहे. पण वस्तूस्थिती ही वस्तूस्थिती आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना टोला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2019 04:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...