मुंबई 30 ऑक्टोंबर : देवेंद्र फडवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी आज पुन्हा निवड करण्यात आली. भाजपचे नवनिर्वाचित सर्व आमदार आणि ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. विधानभवनात झालेल्या या कार्यक्रमात भाजपच्या सर्व आमदार आणि नेत्यांनी भगवे फेटे घातले होते. यावेळी मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री म्हणाले शंकेचं कुठलंही कारण नाही. ज्यांना शंका घ्याची आहे ते चर्चा करत आहेत. आपण महायुती म्हणून मतं मागितली, लोकांना समोरे गेलो, लोकांनी बहुमताने निवडणून दिलं आणि आता महायुतीचच सरकार येणार आहे यात कुणालाही शंका घेण्याचं कारण नाही. ते पुढे म्हणाले, गेल्या पाच वर्षात सरकारने उत्तम काम केलं. मात्र सर्वच आम्ही केलं आणि ते झालं असा दावा आमचा नाही. ‘जे ठरलंय तेवढंच मिळणार, जास्त मागणी करू नका’, भाजप खासदाराचा सेनेला अल्टीमेटम राहिलेली काम पुढच्या पाच वर्षात पूर्ण करणार आहोत. सर्व जाती, धर्म आणि पंथांच्या लोकांनी भाजपला मतदान केलं आहे. सर्वच वगाचं प्रतिनिधित्व भाजपमध्ये आहे त्यामुळे भाजप हा सर्व सामान्यांचा पक्ष ठरलाय असंही ते म्हणाले. गेली पाच वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक म्हणून काम केलं आणि आता पुढील पाच वर्षही महाराजांचे सेवक म्हणून काम करणार असंही ते म्हणाले. विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी मांडला आणि विविध पक्षांच्या 10 आमदारांनी त्याला अनुमोदन दिलं.
VIDEO : सत्तावाटपाबाबत गिरीश महाजन यांचं मोठं विधान, म्हणाले…
अशी झाली निवड भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन करत निवडला आपला विधिमंडळ नेता निवडला आहे. देवेंद्र फडणवीस यांची एकमताने विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. विधानभवन परिसरात भाजपचा जोरदार कार्यक्रम सुरू आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. देवेंद्र फडणवीस तीन टर्म पूर्ण करोत, अशा शुभेच्छाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिल्या. भाजपच्या केंद्रीय निरीक्षक नरेंद्र सिंग तोमर यांच्या नेतृत्त्वात ही प्रक्रिया सुरू झाली. देवेंद्र फडणीस यांच्या विधिमंडळ नेतेपदासाठी चंद्रकांत पाटलांचा प्रस्तावावर सुधीर मुनगंटीवार, हरीभाऊ बागडे, सुरेश खाडे, संजय कुटे, राधाकृष्ण विखे पाटील, देवयानी फरांदे, गणेश नाईक, देवराव होळी, मंगलप्रभात लोढा, शिवेंद्रराजे भोसले, आशिष शेलार यांनी अनुमोदन दिले. नरेंद्र सिंग तोमर यांनी विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांनी निवड करण्यात आली आहे.
मोदींच्या ‘जेम्स बॉण्ड’च्या मदतीला आता मराठी ‘सुपरकॉप’
काय म्हणाले चंद्रकांत पाटील… वसंतराव नाईक यांची टर्म 11 वर्षांची होती, त्यांचा रेकॉर्ड आम्ही तोडणार आहोत, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. आज सर्वजण खूप आनंदात आहोत. राज्यात बिगर काँग्रेस सरकार पुन्हा आले. पाच वर्षे सलग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टर्म पूर्ण केली. स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा 11 वर्षाचा मुख्यमंत्रिपदाचा रेकॉर्ड देवेंद्र फडणवीस तोडतील. राज्यात सर्वाधिक जागा मिळलेला आपला पक्ष आहे. वयाचा आणि अनुभवाचा आदर आमच्याही मनात आहे. पण वस्तूस्थिती ही वस्तूस्थिती आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना टोला लगावला.