• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, देवेंद्र फडणवीस घेणार शरद पवारांची भेट

राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, देवेंद्र फडणवीस घेणार शरद पवारांची भेट

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे.

  • Share this:
मुंबई, 07 एप्रिल: मुंबईत स्फोटकांनी गाडी सापडल्याचे प्रकरण, सचिन वाझेंना (Sachin Vaze) अटक, महाविकास आघाडीच्या (MVA Government) दोन मंत्र्यांचा राजीनामा या घडामोडींनी राज्यातील राजकारण ढवळून निघाले. आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहे, असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे. शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवास्थानी जाऊन फडणवीस त्यांची भेट घेणार आहे.  शरद पवार यांच्या प्रकृती संदर्भात चौकशी करण्यासाठी फडणवीस भेट घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस आज किंवा परवा भेट घेणार आहे. कोव्हिडबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय, कारमध्ये एकटे असाल तरी मास्क अनिवार्य शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास होत असल्यामुळे मागील आठवड्यात मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला असून सिल्वर ओक या निवास्थानी विश्रांती घेत आहे. राज्यभरातील कडक लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणणार? राजेश टोपेंचं स्पष्टीकरण विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची अहमदाबाद येथील गुप्त भेट झाल्याची चर्चा रंगली होती. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते ही अफवा असल्याचे म्हणत होते तर दुसरीकडे खुद्द अमित शहांनी सर्वच गोष्टी सार्वजनिक करता येत नाही, असं सूचक विधान केलं होतं. पण, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अशी भेट न झाल्याचा वारंवार दावा केला होता. आता देवेंद्र फडणवीस हे शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेणार आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
Published by:sachin Salve
First published: