सुशील पांडे, नवी दिल्ली, 07 एप्रिल: देशातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयावह आहे. कोरोनाची दुसरी लाट देशामध्ये विस्तारू लागली आहे. अशावेळी दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कारमध्ये तुम्ही जरी एकट्याने प्रवास करत असाल तरी देखील मास्क वापरणे अनिवार्य असेल. यासंदर्भात दाखल एका याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे. दिल्ली हायकोर्टाने चारचाकी एक पब्लिक प्लेस म्हटले आहे, अशावेळी मास्क वापरणे अनिवार्य असेल.
दिल्ली उच्च न्यायालयाने यासंदर्भातील एका याचिकेवर सुनावणी करताना असे म्हटले की, कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी मास्क एकप्रकारे सुरक्षा कवच आहे. मास्क तो परिधान करणाऱ्या व्यक्तीचीही सुरक्षा करतं, त्याचप्रमाणे त्याच्या समोर असणाऱ्या व्यक्तीचीही.
Delhi High Court rules mask mandatory even if a person is driving alone. It states that a mask acts as a 'suraksha kavach' which would prevent the spread of COVID19. pic.twitter.com/litzyIQ4iN
दरम्यान दिल्ली हायकोर्टाच्या या निर्णयाबाबत सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं असून काही युजर्स उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर टीका करत आहेत.