कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही, राम मंदिरावरून देवेंद्र फडवणीसांचा पलटवार

कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही, राम मंदिरावरून देवेंद्र फडवणीसांचा पलटवार

कोणाच्या पोटात दुखलं तरी चालेल पण समाजाच्या मदतीनं राम मंदिर उभे राहील.

  • Share this:

मुंबई, 22 डिसेंबर: विश्व हिंदू परिषद आणि राम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून राम मंदिर (Ram mandir, Ayodhya)उभं करायचं आहे. कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही. राम हे संपूर्ण समाजाचं आहेत. त्यांचं मंदिर वर्गणीतूनच तयार होईल. तुम्ही मदत द्या, तुमच्याकडे ही पाठवू, असा सणसणीत टोला भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस (Devendra Fadanvis) यांनी शिवसेनेचं नाव न घेता लगावला.

हेही वाचा...राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येने ओलांडला 19 लाखांचा टप्पा, धोका कायम

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी लिखित 'अयोध्या' या पुस्तकाचं प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, काही लोकांनी मुद्दा उपस्थितीत केला होता की, राम मंदिर लोकांच्या मदतीनं उभं करायचं का ट्र्स्टच्या पैशातून. सोमनाथ मंदिराच्या वेळेस असाच मु्ददा उपस्थित झाला होता. सरदार वल्लभभाई पटेल यांनी जनतेच्या मदतीनं करायची भूमिका घेतली. मात्र, त्यावेळी सरदार पटेल यांना पंडित नेहरुंनी विरोध केला होता. पण, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सरदार पटेल यांच्या भूमिकेचं समर्थन केलं होतं, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

धर्मनिरपेक्ष राहणे गरजेचे पण धर्म तिरस्कार करायचा असा नाही. कोणाच्या पोटात दुखलं तरी चालेल पण समाजाच्या मदतीनं मंदिर उभे राहील. 2024 च्या निवडणूक आधी मंदिर खुले होईल. समाजाच्या मंदिर समाजाच्या भरोसावर तयार झाले पाहिजे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

हेही वाचा..कर्जात बुडालेल्या कंपन्यांना दिलासा! अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषण

गेली अनेक दशकं राम मंदिर संघर्ष सुरू आहे. अयोद्धा मंदिर आणि मशीद वाद नव्हता. मंदिराची जागा कमी नव्हती. बाबराला मंदिराची जागा हवी होती. कारण एखाद्या समाज मानसिक खच्चीकरण करायचं असेल तर आत्मासन्मानावर संस्कृतीवर घाला केला जातो. तेच त्यावेळी बाबरानं केलं होतं, असं फडवणीस यांनी सांगितलं. आपले मानबिन्दु गुलामिगीरीत टाकण्याच काम बाबरानं केलं. हिंदु संस्कृतीनं प्रत्येकाला सहारा दिला होता. पण त्याचा गैरफायदा काही जणांनी घेतल्याचं फडवणीस म्हणाले.

Published by: Sandip Parolekar
First published: December 22, 2020, 8:20 PM IST

ताज्या बातम्या