Home /News /mumbai /

ही तर संजय राऊतांची पोटदुखी, 2024 ची भीती कशाला? भाजप नेत्यानं डागली तोफ!

ही तर संजय राऊतांची पोटदुखी, 2024 ची भीती कशाला? भाजप नेत्यानं डागली तोफ!

अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? असा परखड सवाल शिवसेनेनं उपस्थितीत केला आहे.

  मुंबई, 21 डिसेंबर: अयोध्येतील राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) मुद्यावरून शिवसेनेनं (Shiv Sena) भाजपवर (Bjp)पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. शेकडो कारसेवकांनी आपलं रक्त सांडलं. बलिदान दिलं. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? असा परखड सवाल शिवसेनेनं उपस्थितीत केला आहे. यावरून भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार आशिष शेलार (Bjp Mla Ashish Shelar) यांनी शिवसेनेसह खासदार संजय राऊत (Shiv sena MP Sanjay Raut) यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. ते म्हणाले संजय राऊत यांची ही पोटदुखी असून राममंदिराच्या कामात पाय अडकवण्याचा प्रयत्न आहे. ई भूमिपूजनाला देखील त्यांनी असाच अडथळा आणला होता, असा आरोप करत संजय राऊत यांना 2024 ची भीती कशाला? असा सवाल देखील आशिष शेलार यांनी केला आहे. हेही वाचा..शिवसेनेला नाशकात धक्का, मोठा नेता भाजपमध्ये करणार प्रवेश शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून राम मंदिराच्या मुद्यावरून सेनेनं भाजपवर पुन्हा एकदा डिवचलं आहे. 'श्रीरामाचं भव्य मंदिर (ram mandir ayodhya) हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकविण्यासाठी बांधलं जात आहे. 4 लाख स्वयंसेवक हे मंदिराच्या वर्गणीनिमित्तानं संपर्क अभियान राबविणार आहेत. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड 2024चा निवडणूक प्रचार आहे. रामाच्या नावाचा राजकीय प्रचार केव्हा तरी थांबवायलाच हवा' असा टोला शिवसेनेनं भाजपला लगावला आहे. त्यावर आशिष शेलार यांनी ट्वीट करून शिवसेनेचा जोरदार समाचार घेतला आहे. ते म्हणाले, विषय क्रेडिटचा नाही. विषय मेट्रोचा, कोस्टल रोडचा किंवा बुलेट ट्रेनचा आहे. प्रश्न मुंबईकरांचे, आम्ही ते विचारतो आणि विचारणारच! म्हणून राग येणाऱ्यांना समर्थांचा हा उपदेश... नको रे मना क्रोध हा खेदकारी। नको रे मना काम नाना विकारी॥ नको रे मना सर्वदा अंगिकारू। नको रे मना मत्सरु दंभ भारु॥, आशिष शेलार यांनी शिवसेनेला ऐकवला आहे. हेही वाचा...ह.भ.प.निवृती महाराज वक्ते बाबा यांचं निधन, वारकरी संप्रदायावर शोककळा या आंदोलनात ज्यांची केवळ होती राजकीय घुसखोरी त्यांनाच झाली होती राम मंदिराच्या भूमी पूजनाची पोटदुखी आणि त्यांनाच आता डोळ्यात खूपतेय "रामवर्गणी", अशी खोचक टीका देखील आशिष शेलार यांनी केली आहे. राम भक्त हो!, मुंबई पालिका कंत्राटदारांच्या मर्जीनं चालवणाऱ्यांना स्वतः च्या खिशातून वर्गणी काढण्याची सवय कुठे आहे? असा सवाल देखील भाजप नेते आशिष शेलार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Sandip Parolekar
  First published:

  Tags: Ashish shelar, Ayodhya ram mandir, BJP, Ram mandir and babri masjid, Sanjay raut, Shiv sena

  पुढील बातम्या