शिवसेनेला नाशकात धक्का, मोठा नेता भाजपमध्ये करणार प्रवेश

शिवसेनेला नाशकात धक्का, मोठा नेता भाजपमध्ये करणार प्रवेश

बाळासाहेब सानप यांनी दोनच वर्षात पुन्हा पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित समजले जात आहे.

  • Share this:

नाशिक, 21 डिसेंबर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सांगलीमध्ये शिवसेनेनं (Shivsena) भाजपला (BJP)  धक्का दिला होता. आता भाजप सुद्धा सेनेला धक्का देण्याच्या तयारीत आहे. नाशिकमध्ये सेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे. सानप यांच्या भाजप प्रवेशामुळे सेनेला मोठा धक्का बसण्याची चिन्ह आहे.

बाळासाहेब सानप यांनी दोनच वर्षात पुन्हा पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित समजले जात आहे.  आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजप मुख्यालयात सानप भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहे, असं वृत्त टीव्ही 9 वाहिनीने दिले आहे.

घरासमोर कचरा टाकल्याच्या धक्क्यानं महिलेचा मृत्यू

विशेष म्हणजे, बाळासाहेब सानप यांची पक्ष बदलण्याची आता हॅटट्रिक साधणार आहे. गेल्या दोन वर्षात सानप यांनी 3 पक्ष बदलले आहे. आता पुन्हा एकदा ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. परंतु, दुसरीकडे सारख्या पक्ष बदलणाऱ्या नेत्याला भाजपमध्ये घेऊन काय फायदा होणार आहे, असा नाराजीचा सूर भाजपच्या कार्यकर्त्यांनी लगावला आहे. एवढंट नाहीतर सानप यांना पक्षात घेऊ नये म्हणून भाजपचा एक गट चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी करत आहे.  पण आगामी नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये सानप यांचा फायदा होईल, असं सांगत सानप यांच्या भाजप प्रवेशाला वरिष्ठ नेत्यांनीच हिरवा कंदील दिला आहे.

56.59% नागरिकांच्या मते शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं; News18 Network सर्वेक्षण

सानप हे नाशिक पालिकेत महापौर राहिले होते. भाजपकडून त्यांनी महापौरपद पटकावले होते. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत विधानसभा लढवली होती. त्यानंतर सानप यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.  2019 ची निवडणूक सानप यांनी लढवली होती, पण पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभेत पराभव झाल्यामुळे सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता शिवसेनेला रामराम ठोकून सानप पुन्हा भाजपमध्ये दाखल होणार आहे.

सचिनसोबत क्रिकेट खेळलेल्या खेळाडूचं कोरोनामुळे निधन

सानप यांची मनधरणी करण्यासाठी सेनेच्या नेत्यांनी प्रयत्न केले होते. एवढंच नाहीतर दोन दिवसांपूर्वी सानप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट सुद्धा घेतली होती. यावेळी सानप यांना मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्याचबरोबर महामंडळ देण्याचे सुद्धा आश्वासन दिले होते. पण, सानप यांचे काही समाधान झाले नाही, त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा घरवापसीचा मार्ग स्वीकारला आहे.

Published by: sachin Salve
First published: December 21, 2020, 10:08 AM IST
Tags:

ताज्या बातम्या